Breaking News

*कन्हान येथे मंत्री मा. सुनिल केदार यांचे भव्य स्वागत* *युवक काॅंग्रेस द्वारे आयोजन*

*कन्हान येथे मंत्री मा. सुनिल केदार यांचे भव्य स्वागत*

 

*युवक काॅंग्रेस द्वारे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्र राज्याचे पशु संवर्धन व क्रिडा मंत्री मा.श्री सुनिल केदार हे रामटेक ला एका कार्यक्रमात जात असतांना कन्हान येथे युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मा.श्री सुनिल केदार यांचे पुष्पहाराने भव्य स्वागत करण्यात आले.
रविवार दिनांक २२ ऑगस्ट २०२१ ला दुपारी १ वाजता दरम्यान राज्याचे पशु संवर्धन व क्रिडा मंत्री मा.श्री सुनिल केदार साहेब नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गा ने रामटेक येथे एका कार्यक्रमाला जात असतांना मा. श्री सुनिल केदार यांचा कफिला कन्हान शहरात दाखल होताच युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तारसा चौक कन्हान येथे मंत्री मा.श्री सुनिल केदार यांचे पुष्प हार घालवुन व युवक काॅंग्रेस जिंदाबाद …. जिंदाबाद चा जयघोष करून भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी कन्हान -पिपरी नगरपरिषद नगरसेविका रेखा टोहणे, कांन्द्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, सदस्य राहुल टेकाम, चंद्रशेखर बावनकुळे, आकिब सिद्धिकी, रोहित बर्वे, अमोल प्रसाद, पंकज गजभिये, रविंद्र कुमार रंग, प्रकाश बोंन्द्रे , शक्ती सिंग, आकाश कापसीकर, शरद वाटकर सह मोठ्या संख्येत काॅंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित राहुन स्वागत केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …