Breaking News

*न प हद्दीतील जनावरांचा बंदोबस्त करा* *रा .कॉ . ची मागणी

*न प हद्दीतील जनावरांचा बंदोबस्त करा*

*रा .कॉ . ची मागणी

वरोरा – वरोरा शहर हद्दीतील वर्दळीच्या ठिकाणावर मोकाट जनावरे बसून असतात,या गुराढोरांचे मालक आपला हेतू साध्य करून जनावरांना हाकलून लावतात,ही जनावरे आनंदवन चौक, रत्नमाला चौक,नागपूर नाका,जुनी नगर परिषद, अशा अनेक भागातील रस्त्यावर बसून असतात,एवढेच नव्हे तर या जनावरांत कुस्ती होऊन रस्त्याने पायदळ,गाडीवाले कित्येकदा पडून जखमी झाले,यात हातपाय मोडणे,डोके फुटणे, असे प्रकार आता नित्याचेच झाले आहे या जनावर मालकावर प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची कारवाही करीत नाही, शहरात जशी शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी ,कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची जवाबदारी नागरिकांची आहे तशी प्रशासनाची सुद्धा असल्याने या मोकाट बेवारस जनावरांवर तात्काळ कारवाही करावी अशी मागणी विशाल पारखी तालुका अध्यक्ष, ,अविनाश ढेंगळे जिल्हा अध्यक्ष ,विदर्भ प्रदेश अध्यक्ष रंजनाताई पारशिवें, बंडू भाऊ भोंगळे,सामाजिक न्याय चे शहर अध्यक्ष अतुल वानखेळे, जयंत टेमुर्डे यांनी निवेदन देऊन केली असून आंदोलन चा इशारा देण्यात आला

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …