Breaking News

*कांन्द्री – कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी राज्य सरकार च्या केला निषेध*

*कांन्द्री – कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी राज्य सरकार च्या केला निषेध*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – केंन्द्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांच्यावर महाविकास आघाडी सरकार ने बेकायदेशीर कारवाई केल्याने भाजपा पारशिवनी तालुका च्या पदाधिकार्यांनी संताजी नगर कांन्द्री – कन्हान येथे महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना सोडण्याची मागणी केली आहे .

मंगळवार दिनांक २४ आॅगस्ट २०२१ ला दुपार च्या नंतर
केंन्द्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांना महाविकास आघाडी सरकार च्या दबावाखाली सत्तेचा बेकायदेशीर वापर करत मंत्री श्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्याने भाजपा पदाधिकार्यांना मध्ये राज्य सरकार च्या विरोधात तीर्व रोष निर्माण झाल्याने या कारवाईच्या निषेधार्थ संताजी नगर कांन्द्री कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका च्या पदाधिकार्यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या नेतृत्वात व भाजपा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या उपस्थिती मध्ये भाजपा पदाधिकार्यांनी महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन केंन्द्रीय मंत्री श्री नारायण राणे यांना सोडण्याची मागणी केली आहे . या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजप ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे ,सुरेंद्र बुधे , राजेंद्र शेंदरे , अमोल साकोरे ,संजय चोपकर , सौरभ पोटभरे ,शैलेश शेळके ,संकेत चकोले ,लोकेश अंबाडकर ,चक्रधर आकरे ,अमन घोडेस्वार , ऋषभ बावनकर , सतीश झलके , प्रफुल हजारे सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …