Breaking News

*गाडेघाट येथे १३८ नागरिकांना लसीकरण*

*गाडेघाट येथे १३८ नागरिकांना लसीकरण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंन्द्र जुनीकामठी व्दारे गाडेघाट येथे १३८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.


कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे बुधवार दिनांक.२३ जुन २०२१ पासुन १८ वर्ष व त्यावरील वयाच्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम सुरूवात करण्यात आली असुन शुक्रवार दिनांक.२७ ऑगस्ट २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान अंतर्गत उपकेंद्र जुनी कामठी व्दारे गाडेघाट गावात १३८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी जुनीकामठी सरपंचा सौ सुजाता सुदेश कावळे, उपसरपंच राहुल गोपीचंद ढोके, ग्रा प सदस्य भुषण इंगोले, मायाबाई मडावी, विद्या उईके, कर्मचारी अमोल वाघमारे, देवा मानकर, आकाश ढोके, आशा वर्कर प्रभा इखार सह गांवकरी पारस यादव, संतोष खंते, प्रतिक सोनटक्के, कपिल फुलझेले, अविनाश खंंडाते, प्रविण कोथरे, अविनाश ढोके, राजेश टेकाम, अक्षय कोथरे, मनोज ढोके आदी ने उपस्थित राहुन नागरिकांना लसीकरणा करिता सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …