Breaking News

निळ्या पाखरांसाठी सजली दिक्षाभूमी

निळ्या पाखरांसाठी सजली दिक्षाभूमी


धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा

आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे

चंद्रपूर येथील दिक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा मंगळवारपासून प्रारंभहोत आहे.
दोन दिवसीय या सोहळ्यात लाखो अनुयायी सहभागी होणार असून .निळ्या पाखरांच्या स्वागतासाठी दिक्षाभुमी सज्ज झाली आहे. दरम्यान .दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध प्रबोधंनात्मक आणी सांस्क् तिक कार्यक्रंमाची मेजवानी अणूयायांना मिळणार आहे.दरवषीँ येथे विविध बौध्दिक कार्यक्रंमाचे आयोजन करण्यात येथे .चंद्रपूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणी विदर्भातील लाखो भाविक दिक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येतात.दिक्षाभूमीवर सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून .येथील आयोजन समितीची धडपळ या साठी सुरू आहे.दरम्यान या ठिकांनी विविध स्टाँल्स लागणार आहे.दरम्यान .दिक्षाभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सोमवारी पोलीस विभागाने दिक्षाभूमीची पाहाणी केली. अणुयायांना कोणताही त्रास होणार नाही .शांतता व सुव्यवस्था कायंम राहावी या साठी पोलीस यंत्रना सज्ज झाली असून हजारो कर्मचाऱ्यांचा ताफा येथे सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आला आहे, मंगळवारी संध्याकाळी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रँली काढण्यात येणार आहे .तर बुधवारी मुख्य सोहळा होणार आहे.आयोजन समीतीने सोमवारी दिक्षाभूमीवर पाहाणी करून तयारीचा आढावा घेतला अध्यक्षस्थानी सोसाटीचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर राहतील .प्रमुख अतिथी म्हणून भदंन्त कूपाशरण . भदंन्त शीलानंद. भदंन्त आर्यसुंत्त. भदंन्त सरणकर.भिक्खुनी खेमा यांची उपस्थिती राहील रात्री आठ ते नव या वेळेत क्रांतीज्योती ही महात्मा फुले यांच्या जिवनावर आधारीत लघुनाटीका अभिनयसुत्रम अँक्टिंग क्लासेसची चंमू सादर करतील .नव ते दहा या वेळेत जागर समतेचा हा बुध्दभीम गितांचा कार्यक्रंम हेमंत शेंडे.आणी संच सादर करतील १६ आँक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन .डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातूकलशासह भिक्खुगण . समता सैनिक दलाच्या शौर्यशील सौनिकांसमवेत पथसंचलनासह मिरवणूक निघेल .अकरा वाजता धम्मक्रांती आणी धम्मदीक्षेची प्रासंगीता यावर परिसंवाद होईल दिवसभर विविध कार्यक्रंम होईल रात्री नव वाजता बुध्द .भीम गितांचा कार्यक्रंम सिनेगायीका वैशाली माडे सादर करतील .डाँ आंबेडकर आंबेडकर मेमोरियल सोसायटी आणी समाजकल्यांण विभागाच्या संयुक्त विद्ममाने हा कार्यक्रंम होत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …