*कन्हान नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन स्वागत*
*शांतता बैठक आयोजित करण्याची मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री विलास काळे यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असुन शहरात वाढलेल्या गुन्हेगारी वर , अवैध धंध्यावर आढा घालण्याकरिता तात्काळ शांतता बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे .
शुक्रवार दिनांक २७ आॅगस्ट २०२१ ला सायंकाळ च्या सुमारास शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेतली असता सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांच्या नेतृत्वात यांच्या उपस्थिती मध्ये पोलीस निरीक्षक विलास काळे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट करुन व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असुन शहरात वाढलेल्या गुन्हेगारी वर , अवैध धंध्यावर आढा घालण्याकरिता तात्काळ शांतता बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता रुषभ बावनकर , नितिन मेश्राम , पंकज गजभिए , मिलिंद मेश्राम , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , सह आदि उपस्थित होते .