Breaking News

*पारशिवनी तालुक्यात भाजप चे दोन तर कॉंग्रेस चे एक सरपंच पद्दी विजयी* *जिल्हा परिषद प अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे यांच्या सर्कल जुनिकामठी येथे भाजप च्या सौ कावळे विजयी*

*पारशिवनी तालुक्यात भाजप चे दोन तर कॉंग्रेस चे एक सरपंच पद्दी विजयी*

*जिल्हा परिषद प अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे यांच्या सर्कल जुनिकामठी येथे भाजप च्या सौ कावळे विजयी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील तीन ग्राम पंचायत च्या सरपंच पदाकरिता निवडणुक संपन्न झाली. यात निलज ग्रामपंचायत सरपंच पद्दी भाजप च्या आशाबाई पाहुणे, जुनिकामठी ग्रामपंचायत सरपंच पद्दी भाजप च्या सुजाता कावळे तर पारडी ग्रामपंचायत सरपंच पद्दी कॉंग्रेस च्या नंदा महालगावे निवडुन आल्याने तालुक्यात भाजप दोन व कॉंग्रेस एक सरपंच पद्दी विजयी होऊन निवडणुक शांततेत पार पडली.


शुक्रवार ला मा. तहसिलदार तथा निवडणुक अधिकारी पारशिवनी ग्राम पंचायत व्दारे तालुक्यातील निलज, जुनिकामठी व पारडी ग्राम पंचायत सरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली. यात ग्रामपंचायत निलज येथे जिल्हा परिषद सदस्य व भाजप विरोधी पक्ष गटनेते श्री व्यकंटेश कारेमोरे यांचे गाव असुन भाजप गटाच्या सौ आशाबाई मोरेश्वरराव पाहुणे यांना पाच मते मिळाले तर सुर्यकांता भास्करराव चकोले यांना दोन मते मिळाल्याने भाजप च्या आशाबाई पाहुणे हया विजयी झाल्या. ग्रामपंचायत निजल येथे निवडणुकीचे अध्याशी अधिकारी म्हणुन मंडळ अधिकारी कन्हान श्री जगदीश जी मेश्राम यांनी निवडणुक व्यवस्थित पार पाडली. जुनिकामठी ग्रामपंचायत येथील रहिवासी पारशिवनी पंचायत समिति सभापती मिनाताई कावळे यांचे गाव असुन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे यांचे जिल्हा परिषद सर्कलचे गाव आहे. तरी सुध्दा भाजप गटाच्या सुजाता सुरेश कावळे हयांना पाच मते तर कॉंग्रेस गटाच्या सुषमा उदय खंते याना दोन मते मिळाल्याने ग्रामपंचायत जुनिकामठी सरपंच पद्दी भाजप गटाच्या सुजाता कावळे हया ग्रामपंचायत सदस्य श्री भुषण इंगोले, श्री राहुल ढोके, सौ विद्याताई बावने, सौ मायाताई मडावी यांचे मते मिळाल्याने विजयी झाल्या. येथील निवडणुकीची मंडळ अधिकारी आम डी श्री बी जी जगधने हयानी कामगीरी बजावली. ग्रामपंचायत पारडी येथे कॉंग्रेस च्या माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई भोयर यांच्या गटातील नंदा रमेश महालगावे यांना पाच मते तर श्री विकास कोल्हे हयाना मात्र दोन मते मिळाल्याने कॉंग्रेस गटाच्या सौ नंदा महाल गावे ग्रामपंचायत पारडी सरपंच पद्दी विजयी झाल्या. येथे निवडणुकीचे कार्य मंडळ अधिकारी नवेगाव खैरी श्री आर डी घुडे अघ्याशी अधिकारी म्हणुन कार्य केले. ग्रामपंचायत निलज ला भाजप च्या सौ आशाबाई पाहुणे व जुनि कामठी येथे सौ सुजाता कावळे भाजप गटाच्या सरपंचा निवडुन आल्या तर ग्रामपंचायत पारडी येथे कॉंग्रेस गटाच्या सरपंचा सौ नंदा महालगावे विजयी झाल्या. तिन ही ग्राम पंचायत सरपंच पदाची निवडणुक शांततेत पार पडली .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …