Breaking News

*खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचा अपघातात मृुत्यु* *नांदगाव शिवारातील घटना प्रकल्पग्रस्त कर्मचारी वर्गात शोककळा चे वातावरण*

*खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचा अपघातात मृुत्यु*

*नांदगाव शिवारातील घटना प्रकल्पग्रस्त कर्मचारी वर्गात शोककळा चे वातावरण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – औष्णिक वीज केंद्रात कार्यरत प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचा कर्तव्या वरून घरी परत येत असताना नांदगाव शिवारात झालेल्या अपघाताने उपचारा दरम्यान दुर्दैवी मुत्यु झाल्याची घटना शनिवार दिनांक.२१ ऑगस्ट ला सकाळ च्या सुमारास घडली असुन प्रकल्पग्रस्त कर्मचारी वर्गात व एंसबा, नांदगाव, बखारी सह कन्हान परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
प्रकल्पग्रस्त कर्मचारी संजय श्रावण धुर्वे वय ३८ राहणार. नांदगाव तालुका पारशिवनी जिल्हा. नागपुर येथील रहिवासी असुन तो मागील चार ते पाच वर्षांपासुन २१० मेगावॅट खापरखेडा औष्णिक वीज केंद्र कोळसा हाताळणी विभागात प्रकल्पग्रस्त कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मृतक संजय हा शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट २०२१ ला सायंकाळ च्या सुमारास वीज केंद्रातुन कर्तव्य आटोपून आपल्या घरा कडे दुचाकी क्र. एम एच ४० बीडी ७७२४ ने परत येत असतांना गोंडेगाव कोळसा खदान ते डुमरी रोडवर नांदगाव शिवारात रात्री ७.३० ते ८:०० वाजता दरम्यान अज्ञात कोळसा ट्रकच्या कटने किंवा वन्य प्राण्याने त्याच्या दुचाकी ला धडक मारल्याने तो दुचाकी सह रस्त्यालगत असलेल्या बांबुच्या झाडा च्या नालीत पडल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने संजय ला गावकऱ्यांनी कामठी व नागपुरच्या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता दाखल न केल्याने परत उशीरा रात्री कामठी च्या एका खाजगी रूग्णालयात कसेतरी दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान शनिवार दिनांक २१ ऑगस्ट ला सकाळ च्या सुमारास त्याचा दुदैवी मुत्यु झाला. संजय हा विवाहित होता. त्याला आई, वडील, भाऊ, पत्नी, छोटा एक मुलगा व एक मुलगी आहे. संजय च्या पार्थिवावर शनिवार ला सायंकाळी शोकाकुल वाता वरणात अंतिम संस्कार करण्यात आला. कामठी पोलीसांनी सदर घटनेची नोंद केली असुन अज्ञात वाहन किंवा वन्य प्राण्यामुळे त्याच्या अपघात झाला असावा असा पोलीसांना संशय असुन पुढील तपासा करीता कन्हान पोलीसाना घटनेची माहीती पाठविण्यात येणार आहे.
बॉक्स
प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना वीज केंद्राच्या वसाहतीत गाळे उपलब्ध करून द्या.
वीज केंद्र व ऍश डॅम तयार करण्यासाठी २५ ते ३० किमी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र त्यांना स्थायी नोकरी न देता प्रकल्पग्रस्त कर्मचारी म्हणुन सामावून घेतले आहे. खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात एकुण ७२ प्रकल्पग्रस्त कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांना मानधनाच्या नावावर फक्त त्यांना १५ हजार रुपये मानधन देण्यात येते. वीज केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रकाशनगर वसाहत तयार करण्यात आली आहे. वीज कर्मचाऱ्यासह पोलीस, कंत्राटदाराना गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना डावळले जात आहे. २५ ते ३० किमी दुर वरून वीज केंद्रात प्रकल्पग्रस्त कर्मचारी येतात त्यामुळे त्यांना खापरखेडा प्रकाशनगर वसाहतीत गाळे उपलब्ध करून देने अपेक्षित आहे. यापुढे अशी दुर्दैवी घटना घडु नये म्हणुन प्रकल्पग्रस्त कर्मचा ऱ्यांनी प्रकाशनगर वसाहतीत गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

संजयच्या पत्नीला नोकरीत सामावुन घ्या

मृतक संजय सह नांदगाव बखारी गावातील ६ प्रकल्पग्रस्त कर्मचारी खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत आहे. मृतक संजयची शेती वीज केंद्राच्या नांदगाव बखारी ऍश डॅम मध्ये गेली असल्याने संजयचे कुटुंब भुमि हीन झाले आहे. प्रकल्पग्रस्तां च्या नावावर खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात मानधनावर संजय ला प्रकल्पतग्रस्त कर्मचारी म्हणुन नोकरी मिळाली खरी मात्र आता संजयचे अपघाती दुर्दैवी मुत्यु झाल्यामुळे कुटुंबाचा आधार पडद्या आड गेला आहे. त्यामुळे संजय च्या विधवा पत्नीला वीज केंद्रात प्रकल्पगस्त कर्मचारी म्हणुन नोकरी देण्याची मागणी समस्त नांदगाव, बखारी ग्रामस्थानी केली आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …