*पाळीव प्राणी भक्षक बिबट्या वाघाचा बंदोबस्त न केल्यास मोठे आंदोलन – आमदार डॉ देवरावजी होळी*
*इल्लुर येथील नुकसानग्रस्त नागरिकांशी थेट संवाद ; फोनवरून केली प्रधान वनसंरक्षक उपवनसंरक्षक यांचेशी केली चर्चा*

*इल्लूर् येथील बिबट्याला तातडीने पकडण्याच्या केल्या सूचना*
*वन विभागाने कारवाई न केल्यास जिल्ह्यात विराट आंदोलन*
गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
गडचिरोली – तालुक्यात धुमाकूळ घालत १३ निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाला तात्काळ पकडून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी वनसंरक्षक यांची भेट घेऊन तर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांचेशी फोनवरून चर्चा करून केली.
आज व तत्काळ ईल्लुर येथे पेपर मिल जवळील जंगल सदृश्य भागात सध्या वास्तव्यास असलेल्या व धुमाकूळ घालून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे शेळ्या मेंढ्या कोंबडी बकरे व ईतर पशुधन फस्त करून खूप मोठे आर्थिक नुकसान करणाऱ्या* *बिबट्या वाघा बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी प्राप्त होत होत्या या तक्रारीची दखल घेऊन आज आमदार डॉ देवराव होळी यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी थेट संवाद साधला व वनविभागाणे शेळ्या मेंढ्या व पाळीव प्राणी फस्त केलेल्या नुकसानग्रस्त गोरगरीब जनतेला आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार डॉ देवराव होळी यांनी केले.

*यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख ,माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाष कुकुडकर , विठ्ठल आवारी प्रकाश बोबाटे , जयराम चलाख प्रतीक राठी येथील वनरक्षक सोनवणे*
*मनोहर पाटील बामणकर ,प्रवीण बामनकर , दशरथ मडावी ,देवराव कुबडे ,राजू देठे व नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते*
*आतापर्यंत २० बकऱ्या शेळ्या मेंढ्या यांचा बळी बिबट्याने घेतला आहे व पाळीव जनावरे गुरे ढोरे यांना या बिबट्या वाघाने जखमी केले असून आता लोकांचा संयम संपत आला आहे. जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामूळे शासनाने तातडीने या जनावरभक्षक बिबट्या वाघाला पकडुन अन्यत्र न्यावे व नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करावी अशी मागणी आमदार होळी साहेबांनी केली. या बिबट्या वाघाचा बंदोबस्त वन विभागाने न केल्यास तालुक्यात मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला*

*यावेळी आमदार महोदयांनी वनसंरक्षक मानकर साहेब यांचेशी फोनवरून चर्चा केली असता त्यानी उपवनसंरक्षक आलापल्ली यांना तातडीनं निर्देश देत बिबट्या वाघाला पकडण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.*
Maharashtra News Media सच की आवाज