*कन्हान क्षेत्रात विविध विकास कामाचे भुमिपुजन*
*रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार श्रीआमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते थाटात संपन्न*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – दलित बस्ती सुधार योजने अंतर्गत २०१९ – २० , नगरोत्थान योजना व दलितोत्तर योजना २०२० – २१ अंतर्गत विविध विकास कामाचे भुमीपुजन रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले .
कन्हान प्रभाग क्रमांक ७ स्वामी विवेकानंद नगर येथे पांडुरंग गेडाम यांच्या घरा जवळ विकास कामाचे भुमीपुजन करण्यात आले असुन शिवाजी नगर येथे मंदा भुजबल यांच्या घरा जवळ विकास कामाचे भुमीपुजन करण्यात आले . प्रभाग क्रमांक ५ रायनगर येथे मदन गुप्ता व गुलाब पगारे यांच्या घरा जवळ विकास कामाचे भुमीपुजन करण्यात आले . प्रभाग क्रमांक ४ हनुमान नगर येथे एमएससीबी आॅफीस जवळ विकास कामाचे भुमीपुजन करण्यात आले . प्रभाग क्रमांक ३ सिहोरा येथे श्मशान भूमि घाट च्या विकास कामाचे भुमीपुजन करण्यात आले . प्रभाग क्रमांक १ च्या नाका नंबर ७ आंबेडकर नगर येथील वराडे यांच्या घरा जवळ विकास कामाचे भुमीपुजन करण्यात आले असुन आदि विविध ठिकाणी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते विकास कामाचे भुमिपुजन थाटात संपन्न करण्यात आले .
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , कन्हान – पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक अनिल ठाकरे , राजेश यादव , राजेंद्र शेंदरे , मनीष भिवगडे , विनय यादव , योगेंन्द्र रंगारी , नगरसेविका मौनिका पौनिकर , सुषमा चोपकर , रेखा टोहणे , गुंफा तिडके , पुष्पा कावडकर , शिवसेना तहसील प्रमुख राजु भोस्कर , कन्हान शहर प्रमुख छोटु राणे , महिला शहर प्रमुख मनिषा चिखले , हरीष तिडके , चिंटु वाकुडकर , सोनु खान , भरत पगारे , समशेर पुरवले , शुभम पिल्ले , अकबर सैयद , मनोज भाऊ , प्रेम रोडेकर , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज