*शेतकऱ्याचे कैवारी शरद जोशीची ८६ जंयती साजरी*

नरखेड तालुका प्रतीनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – दि.३/८/२०२१ ला रोज शुक्रवारला नरखेड तालुका शेतकरी संघटना कडून स्थळ खैरगाव ( देवळी येथे रामचंद्र बहुरपी यांच्या घरी साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायणराव बांदरे होते.प्रमुख उपस्थिती म्हणून मदन कामडे (विदर्भ अध्यक्ष ) अरूण केदार ( नागपूर जिल्हा अध्यक्ष, शेषराव हरणे, हंसराज बांदे ,शिक्षक प्रमोद वघाडे ,डॉ संजय ढोकणे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र हरणे,मुरलीधर ठाकरे, शेतकरी महिला संघटक सुनिता कोरडे, इंदिरा बहुरूपी, यां सर्वांनी पुष्पहाराने आंदराजली वाहीली या कार्यक्रमात सहभागी मोवाड, खैरगाव, देवळी,नरखेड तालुक्यातील ईतर गावकरी उपस्थित होते.दिलीप काळमेंघ ,तुकाराम क्षिरसागर ,रामदास नासरे,प्रभाकर ठाकरे, मोतीराम चरपे,रामभाऊ धमंदे,संजय हरणे यांना कोरोना काळात मूत्यू आला.अशा शेतकरी संघटनेचे निष्टावान शेतकऱ्यांना मैन श्रद्धांजली वाहिली यावेळी शासनाने संपूर्ण कर्ज मुक्ती, विज बिल माफ,वन्य प्राणी यापासून होणारे शेतकऱ्याचे नुकसान याला भरपाई देण्यात यावे.

सोयाबीन पिकाचे नुकसान झाले याची भरपाई देण्यात यावी,वेगवेगळ्या विदर्भ झाला पाहिजे अशा अनेक विषयांवर प्रमुख
व्यक्ततेनी म्हणून अरुण केदार जिल्हा अध्यक्ष यांनी भाष्य केलेत शरद जोशी यांनी ज्या मुळ उद्देश साठी शेतकरी संघटना ची स्थापन केली ते प्रश्न शासनाने लवकरात लवकर सोडवावेत विदर्भातील युवकांना जर रोजगाराच्या प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने वेगवेगळ्या विदर्भ हा करणे गरजेचे आहेत आता पर्यंत मराठवाडातील लोकांनाच जास्त निधी देण्यात आला तसेच अनेक शेतकरी यांच्या योजना च्या लाभ हा विदर्भातील शेतकरी यांना कमी मिळालात विज निर्माती ही जास्त प्रमाणात विदर्भात होते पण यांच्या जास्त फायदा हा ईतरांना होतो.असे प्ररखड विचार मांडणेत आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव वैघ तालुका अध्यक्ष यांनी तर आभार रामचंद्र बहुरूपी यांनी केले याप्रसंगी वसंतराव चापले,भाऊराव नासरे,विठ्ठल मानेकर ,
मोती रामलाखे, कावडे ,कुर्वे गोलु चक्रपाणी, भाऊराव लोहे,भिमराव सांबारे,नामदेव मेंढे,धनराज कनिरे, प्रकाश वालुरकर,विठ्ठल मदनकर, कार्यक्रमाची सांगता ही सहभोजन करणेत आली.
Maharashtra News Media सच की आवाज