*भीम आर्मीचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांना निवेदन*
सावनेर – भीम आर्मी भारत एकता मिशन नागपुर जिल्हा – सावनेर तालुका संघटन शिष्टमंडळ आणि कोच्छी बँरेज प्रकल्पग्रस्त पिडीत नागरिकांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानी पालकमंत्र्यांची भेट घेतली.*
*भीम आर्मी शिष्टमंडळाने मा. प्रफुल्ल भाऊ शेंडे यांच्या मार्गदर्शनात कोच्छी बँरेज प्रकल्पग्स्तांवर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध मा. अंकीतजी राऊत नागपुर ग्रामीण जिल्हाअध्यक्ष तसेच नागपूर शहर अध्यक्ष मा.रोहित नंदेश्वर जी यांच्या नेतृत्वात तीव्र विरोध दर्शवला व भीम आर्मी,*मागासवर्गीयांवर होत असलेला अन्याय कदापी खपऊन घेणार नाही व प्रसंगी महाराष्ट्र शासनाविरूद्ध राज्यभर तीव्र निषेध आंदोलन छेडेल,असे ठणकाऊन सांगीतले.*
*या प्रसंगी भीम आर्मी शिष्टमंडळ व पालकमंत्र्यां सोबत शाब्दीक चक-मक ही बघायला मिळाली.*
*भीम आर्मी च्या प्रमुख मागण्या*
१) १० जुन २०२१ ला कोच्छी गावातील ६ मागासवर्गीय कुटुंबांचा पाटबंधारे विभाग व सावनेर तालुका प्रशासनाद्वारे कसलीही पुर्वसुचना न देता हुकुमशाही पद्धतीने घरांची तोड-फोड करून गोर – गरीब मागासवर्गीय कुटुंबांना पुनर्वसन न करता बेघर करण्यात आले होते त्यावर तीव्र रोष दर्शवीत त्याना प्रत्येकी २-२ लाख रूपये अतिरीक्त मुआवजा देण्यात यावा आणि आरोपी अधिकार्यांविरूद्ध अँट्राँसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवुन निलंबनाची कार्यवाही करावी .
२) कोच्छी मुळ गावठान सर्वे नं. ४३/५ ची सखोल चैकशी करून पुनर्मोजणी करण्यात यावी .
३) सदर प्रकरणाची चैकशी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीष यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी व आवर्जुन त्यात मागासवर्गीय व गावातील किमान एक-एक प्रतिनिधी घ्यावा .
४) कोच्छी बँरेजमधील प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उच्चशिक्षीत तरूणांना लवकरात – लवकर सरकारी नैकरी देण्यात यावी
५) यापुढे कोणत्याही प्रकल्पग्रस्त कुटुंबाला जबर्दस्तीने घर खाली करून त्यांचे घर पाडुन त्यांना बेघर करू नये .
६) प्रकल्पग्रस्तांचे आधी पुनर्वसन करा नतंरच पुढील काम करा
७)मागासवर्गीय कुटुंबांवर होणारा अन्याय थांबवावा .
वरील मागण्या जर माण्य झाल्या नाहीत तर संपुर्ण राज्यात भीम आर्मी महाराष्ट्र शासनाविरूद्ध राज्यभर तीव्र निषेध आंदोलन छेडेल.
शिष्टमंडळात भीम आर्मी
नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अंकीतजी राऊत
नागपुर शहर अध्यक्ष रोहीतजी नंदेश्वर,सावनेर तालुका अध्यक्ष मयूर कुमार नागदवणे जी,नागपुर जिल्हा प्रवक्ता अमोल कुमार चिमनकर,सोशल मिडीया प्रमुख आयुषजी बागडे,व इतर भीम आर्मी सहकारी उपस्थित होते .