*पोळा व गणपती उत्सवाच्या काळात शासन निर्देशांचे काटेकोर पालन करा- उपविभागीय पोलिस अधिकारी नयन आलुरकर*
रामटेक – कोरोणा आटोक्यात असला तरी आगामी काळातील संभावित तिसरी लाट लक्षात घेऊन येत्या काळात साजरा होणा-या पोळा, तान्हा पोळा व गणेशोत्सवामध्ये शासन निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. कुठल्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी गावा-गावातील पोलीस पाटील व सरपंच यांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन रामटेकच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नयन आलुरकर यांनी केले. रामटेक येथे गंगा भवनम् येथे दि.3 सप्टेंबर 2021रोजी रामटेक पोलिस स्टेशनच्या वतीने पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन हद्दीतील सरपंच,पोलीस पाटील, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष, डीजे चालक- मालक यांची सभा संपन्न झाली. या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनातर्फे उत्सव साजरा करताना अनेक प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहेत. याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.
या सभेला पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, नायब तहसीलदार मनोज वाडे, नगरसेवक प्रवीण मानापुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यावले, निशा भुते,पीएसआय प्रमोद राऊत,सीमा बेंद्रे,शिवाजी बोरकर आदी मान्यवरांसह पोलीस स्टेशन हद्दीतील सरपंच,पोलिस पाटील, सार्वजनिक गणेश मंडळांचे अध्यक्ष डीजे चालक-मालक यांची उपस्थिती होती.
Maharashtra News Media सच की आवाज