*संजूबाबा यांचा रामटेक दौरा*
*फिल्म सिटी साठी जागेची पाहणी*
रामटेक – ना.नितीन राऊत, मंत्री ऊर्जा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपुर जिल्हा यांच्यासोबत प्रसिद्ध फिल्म अभिनेते संजय दत्त यांनी रामटेक येथे फिल्म उद्योग(फिल्म सिटी) स्थापित करण्यासंदर्भात रामटेकच्या निसर्गरम्य परिसरातील खिंडसी,पंचाळा,पिपरीया पेठ व नवरगाव (नागार्जुन) क्षेत्रातील भागाची पाहणी केली. फिल्मसिटी उभारण्यासाठी सुमारे चारशे एकर जागेची आवश्यकता असून याबाबत चाचपणी करण्यासाठी हा दौरा होता असे कळते.यावेळी त्यांच्या सोबत पं.स.माजी उपसभापती उदयसिंह उर्फ गज्जू यादव उपस्थित होते.