*कन्हान नदी पात्रात पाच युवकांचा बुडून मृत्यु*

*सायंकाळ पर्यंत एकच लाश मिळाल्याची माहिती*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट अम्माचा दर्गा येथे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून १३ युवक दर्शना साठी आले असता युवकांनी दर्शन करुन कन्हान नदी च्या पात्रात आंघोळी साठी उतरले असता यापैकी पाच युवकांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन गौताखोर च्या मदतीने बुडालेल्या पाच युवकांचा शोधबीन सुरु केले असता सायंकाळ पर्यंत एकच लाश मिळाली असुन पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १) सय्यद अरबाज ऊर्फ लकी (वय २२), २) अयाज बेग हफीज बेग (वय २०), ३) मो. अनुअर मो. अल्फाज (वय १८), ४) मो. सप्तहीन मो. इकबाल शेख (वय २१) व ५) ख्वाजा बेग तबुस्सर बेग (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. कन्हान पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गाडेघाट येथील अम्माचा दर्गा धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. एक सप्टेंबर पासून येथे ताजुद्दीन बाबा यांचा शंभरावा ऊर्स सुरू झालेला असुन उर्सला उपस्थित राहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. या ऊर्सला उपस्थित राहण्यासाठी १३ युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी काठावरील अम्माचा दर्गा गाडेघाट येथे आले असता ताजबागच्या उर्समध्ये सहभागी झाल्या नंतर गाडेघाट येथील अम्माचा दर्गामध्ये आले होते
त्यानंतर समोरून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात काही युवक अंघोळ करण्यासाठी गेले. तर काही युवक गाडीमध्ये आराम करीत होते. आंघोळ करीत असतांना एक युवक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी एका मागे चार युवक गेले. मात्र, तेही वाहून गेले. घटनास्ळावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली. माहिती मिळताच कन्हान पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी जिवन सुरक्षा रक्षक दलाच्या (गोताखोरच्या) मदतीने युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता सायंकाळ पर्यंत एकच लाश मिळाली असुन बातमी लिहल्या पर्यंत चार लाश मिळाले नव्हते .
सदर प्रकरणाचा पुढील तपास नागपुर ग्रामीण पोलीस उपअधिक्षक श्री राहुल माखणीकर उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , उपनिरीक्षक जावेद शेख , सह अन्य पोलीस कर्मचारी करत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज