*चनकापूर-खापरखेडा सभेत अमित शहा यांनी पाळले मौन*

*चनकापूर-खापरखेडा सभेत अमित शहा यांनी पाळले मौन*

*जाहीर सभेत 370, पुलवामा फक्त निवडणुकीचे लक्ष*

स्थानिक व राज्याचे तसेच शेतकरी कर्ज माफी,आत्महत्या, ओला दुष्काळ व बेरोजगारी सारख्या महत्वपूर्ण मुद्यांना बगल*

*खापरखेडा प्रतिनिधी -दिलीप येवले*

सावनेरःमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारे शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचले आहेत विधानसभा निवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा चनकापूर-खापरखेडा येथे 18 ऑक्टोबर शुक्रवारला संपन्न झाली मात्र यावेळी भाजपने तिकीट नाकारलेल्या पालकमंत्री बावनकुळे यांच्या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा काही तरी बोलतील असे वाटले असतांना त्यांनी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या संदर्भात बोलण्याचे टाळले असल्यामुळे बावनकुळे यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे सायंकाळी 7.30 वाजता तब्बल 3-30 तास उशिरा अमित शहा यांचे सभा स्थळी आगमन झाले यावेळी जिल्ह्यातील सावनेर कळमेश्वर,कामठी व रामटेक या तीन विधानसभा क्षेत्रातील जवळपास 10 हजार लोकांची गर्दी जमली होती मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजीव पोतदार, कामठी विधानसभा मतदार संघाचे टेकचंद सावरकर यांच्यासह मंचावर सुलेखा कुंभारे, श्रीकांत देशपांडे, अरविंद गजभिये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, संजय टेकाडे, अशोक धोटे, प्रकाश टेकाडे, दादाराव मंगळे, रमेश मानकर, सोनबा मुसळे, अरुण सिंग, यांच्यासह अनेक जिल्ह्यातील नेते उपस्थित होते मात्र यावेळी अमित शहा यांनी राष्ट्रीय मुद्दे उपस्थित केले कलम 370, पुलवामा एअरस्ट्राईक, ट्रिपल तलाक आदि मुद्यावर अमित शहा यांनी भाष्य केले यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली मोदी सरकारने केलेल्या विकासाच्या झंजवातामुळे महाराष्ट्र व हरियाणा राज्यात भाजप मित्रपक्षाचे सरकार येत आहे भाजप विकासाचे राजकारण करीत आहे मात्र विरोधक वेगळ्या दिशेने जात आहे भाजपचा नारा सब का साथ सब विकास असल्याचे सांगितले.

यावेळी मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंचावर आवर्जून उपस्थित होते बावनकुळे यांची तिकीट कापल्यानंतर त्याना कोणती जवाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष होते चंद्रकांतदादा पाटील निवडणूक लढवीत असल्याने राज्याची जबाबदारी बावनकुळे याना अमित शहा देतील अशी चर्चा परिसरात होती मात्र संपूर्ण 40 मिनिटाच्या भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मौन पाळले दोन दिवसांपूर्वी झालेल्या रामटेक येतील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचे जाहीर केले होते मात्र यासंदर्भात अपेक्षित असतांना चनकापूर-खापरखेडा येथे झालेल्या जाहीर सभेत अमित शहा यांनी कोणतीही घोषणा केली नाही हे विशेष! त्यामुळे बावनकुळे यांचे भवितव्य तूर्तास लटकले असल्याचे दिसून येते विधानसभा निवडणुका दोन दिवस शिल्लक आहेत पालकमंत्री बावनकुळे जिवाचे रान करून त्यांनी प्रचाराची धुरा सभाळली आहे मात्र अमित शहा त्यांच्या संदर्भात का मौन धारण करीत आहेत हे समजण्या पलीकडे आहे एकूण महाराष्ट्राच्या निवडणुकीत 370, पुलवामा, एअर स्ट्राईक, ट्रिपल तलाक आदी मुद्दे भाजपने समोर उपस्थित केले असून सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना का तिलांजली देत आहेत हे समजण्या पलीकडे आहे 24 तारखेला विधानसभा निवडणुकांचे निकाल येणे अपेक्षित आहे *जो जिता वही सिकंदर* हेच वेळ ठरविणार आहे.

 

*24 तारखे नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुढील राजकीय भवितव्य काय असा सवाल आता नागपूर जिल्ह्यासह बावनकुळे समर्थकांना सतावू लागली आहे तर काँग्रेसचे विद्देमान आमदार सुनील केदार यांच्या विरोधात प्रचारा करिता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष,केन्द्रिय गु्हमंत्री अमित शाह,हेवीवेट मंत्री नितिन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस,सिने कलाकार व खासदार सनी देवल,पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सह सर्व पट्टीचे स्टार प्रचारक मैदानात उतरून घाम गाळत असल्याने सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात “एक अकेला केदार,सब पर भारी”असे चित्र व चर्चा रंगत आहे.21 तारखेला मतदान व 24 तारखेला मतमोजनी तुन सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील मतदाते कुणाला आपला आशीर्वाद देऊण विजयी करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …