*छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये आगळा वेगळा शिक्षक दिन व साक्षरता दिन साजरा*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय ,सरस्वती माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय सरस्वती भवन हायस्कूल अँड कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ लता वाघ, प्रमुख पाहुणे म्हणून रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ सत्यवान मेश्राम, आंध्रप्रदेश शासनाच्या पुराभिलेखागार विभागात रिसर्च स्कॉलर म्हणून कार्यरत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागामार्फत चालणाऱ्या राष्ट्रीय हस्तलिखित संशोधन मिशन मध्ये कार्य करणारे श्री भुजंग रामराव बोबडे, भवन कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका केरेन यंगड, हायस्कूल कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका निशा फिलिप्स उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व दीप प्रज्वलित करण्यात आला.त्यानंतर कोरोना काळामध्ये सर्व शिक्षकांनी आपल्या वतीने ऑनलाईन क्लासेस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. याचाच मान म्हणून व एक सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून किशोरी काकडे भड यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकांना विविध त्यांच्या कलागुणांना व त्यांच्या स्वभावानुसार एक नाव देऊन त्यांना नामांकित करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेच्या संचालिका प्राचार्या सौ लता वाघ यांनी शिक्षकांनी असच हसत विद्यार्थ्यांना विद्येचे दान करत रहावा व स्व प्रगतीबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा देखील विचार करावा असे सांगितले. कोरोना काळामध्ये सर्व शिक्षकांनी ऑनलाईन क्लासेस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले त्याची देखील प्रशंसा करण्यात आली. यानंतर भुजंग बोबडे सर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी जे हेरिटेज फाउंडेशन सुरू केलेले आहे त्याचं महत्त्व समजून सांगितलं व एक विद्यार्थी म्हणून प्रत्येक शिक्षकाने कसं इतर विद्यार्थ्यांना घडवत रहाव त्याचबरोबर पुराभिलेखागार वस्तुसंग्रहालय यांच्या माध्यमातून आपण एक ऐतिहासिक जपणूक कशी करू शकतो याचे विविध उदाहरणे देऊन त्यांचे राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम साहेबांसोबतचे अनुभव शिक्षकांना सांगितले. यानंतर डॉक्टर मेश्राम सर यांनी प्रत्येक शिक्षकांनी कसं सर्व गुण संपन्न असावं याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुवर्णा जांभूळकर,सूत्रसंचालन प्रा. सोनी सिंग व प्रीती कुरील मॅडम ,आभार प्रदर्शन प्रा. प्रीती बढीये यांनी केले. कार्यक्रम संस्थेचे सदस्य प्राध्यापक वसंत हिवरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडला.कार्यक्रमाला विशेष सहकार्य लक्ष्मी तिवारी, निशा फिलिप्स, स्नेहल ताजने प्रा.आनंद ठाकरे, प्रा. सुनिता नागपुरे प्रा.वंदना आमले,प्रा. रश्मी जवंजाळ , प्रा. कवीश्वर खोपे,कलावती हिवरकर मॅडम, कविता पाखरे मॅडम , लीला वाघ मॅडम यांचे लाभले. कार्यक्रम covid-19 च्या नियमानुसार पार पडला.
Maharashtra News Media सच की आवाज