Breaking News

*धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे कल्याणी सरोदेंचा सत्कार*

*धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे कल्याणी सरोदेंचा सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांन्द्री येथील प्रसिद्ध ब्युटीशीयन कल्याणी सरोदे हिचा नुकताच धर्मराज विद्यालय शैक्षणिक संस्थे तर्फे कौटुंबिक सत्कार करण्यात आला.


धर्मराज विद्यालय शैक्षणिक संस्थेतुन २००८ वर्षी शिक्षण घेतलेल्या कल्याणी सरोदेने अभियांत्रिकी शिक्षण पुर्ण करून ब्युटीशीयन मध्ये करीअर अजमाव ले आहे. ती सध्या एक नामांकित ब्युटीशीयन असून चित्रपट सृष्टीतील राहूल वैद्य, विकास महाजन, रविशंकर शहा, प्रसाद ठवकर या सारख्या दिग्गज कलाकारांचे मेकअप केले आहे. नुकताच २८ ऑगस्ट रोजी गोवा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता सोनु सुद यांच्या हस्ते “इंटरनॅशनल बेस्ट मेकअप आर्टि स्ट” हा पुरस्कार कल्याणी सरोदे ला देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने धर्मराज विद्यालय शैक्षणिक संस्थे तर्फे अनिल सार्वे, अनिरुद्ध जोशी, सुनिल लाडेकर, अनिल मंगर, हरिष केवटे, नरेंद्र कडवे, उदय भस्मे, सतीश राऊत, प्राथमिक विभागाचे खिमेश बढिये, प्रशांत घरत, विलास डाखोळे, राजुसिंग राठोड यांनी कुमारी कल्याणी सरोदे ला वृक्ष देऊन अभिनंदन केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …