*कांन्द्री आंगणवाडी सेविका सौ कुसुमताई किरपान सेवानिवृत्तीपर समारंभासह निरोप*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कांन्द्री येथील आंगणवाडी क्रमांक १५८ येथील सेविका कुसुमताई कृष्णराव किरपान या सेवानिवृत्त झाल्याने कांन्द्री च्या सर्व आंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी मिळुन त्यांना समारंभासह निरोप दिला.

कांन्द्री येथील आंगणवाडी क्रमांक १५८ येथे कांन्द्री च्या सर्व आंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी निरोप समारंभाचे आयोजन करून आंगणवाडी सेविका कुसुमताई कृष्णराव किरपान (माजी सरपंचा) यांना पुष्पगुच्छ, शाॅल, श्रीफल व विशेष उपहार देऊन सर्व आंगनवाडी सेविका व मदतनिस यांनी शब्द सुमनाने निरोप दिला. या प्रसंगी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र पर्यवेक्षिका सौ माधुरी राऊत, श्री मोर्याजी, वयोवृद्ध ग.भा सुशिलाबाई दिनानाथ नासरे, ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष श्री मोतीराम रहाटे, सामाजिक कार्यकर्ता वामन देशमुख आदि मान्यवरांनी कुसुमताई किरपान यांना पुष्पगुच्छाने स्वागत करून त्याच्या कार्याचे कौतुक करित पुढील आयुष्य सुखी, समृद्ध व निरोगी च्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविका मिना पडोळे यांनी तर आभार मनिषा वासनिक यांनी व्यकत केले. त्यानंतर सर्वांना भोजन देऊन समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वि तेकरिता आयोजक मनिषा वासनिक, चंन्द्रप्रभा नासरे, शशीकला बागडे, मंगला कामडे, मिना पडोळे, शोभा सरोदे, प्रभा चाफले, सरोज पानतावने, सुनिता मारबते, सत्यफुला आष्टणकर, नलु गिऱ्हे, प्रभा डोरले, सुमित्रा वैद्य, प्रतिक्षा सुखदेवे, छाया मस्के, रेखा मस्के, पौर्णिमा , रिना सुखदेवे आदिंनी सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज