*व्हीएसपीएम एकेडमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूर संस्थेतील माजी प्राचार्य व मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ*

नागपुर – व्हीएसपीएम एकेडमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूर संस्थेतील माजी प्राचार्य व मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ इंडो पब्लिक स्कूल काटोल येथे पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.रणजितबाबू देशमुख, संस्थेचे सचिव मा. युवराजजी चालखोर,संस्थेचे सहसचिव मा. दिनकररावजी राऊत, संस्थेचे संचालक मा.प्रकाशजी मक्रमपुरे,संस्थेचे संचालक चंद्रशेखरजी बरेठीया, संस्थेचे संचालक मा.सुरेशजी बांदरे, प्रामुख्याने उपस्थित होते. सत्कारमुर्ती मा. प्राचार्य विजयजी धोटे, मा.मुख्याध्यापक उत्तमरावजी चौधरी, मा.मुख्याध्यापक नरेंद्र दाऊतपुरे,मा.मुख्याध्यापक हरिहर ठाकरे, मा.मुख्याध्यापक कृष्णकांत पांडव, मा.मुख्याध्यापक अनिलजी वानोडे, मा.मुख्याध्यापक हरिश्चंद्र बारई, यांचा सत्कार संस्थेच्या पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आला.
हि प्रेरणा मा.डाॅ. भाऊसाहेब भोगे यांनी दिलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थितांनी सत्कारमुर्ती व संस्थेच्या प्रती गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक श्री.यावले सर, रंभाड सर, खोडे सर, दवंडे सर, परेतकर मॅडम, हे सुध्दा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अशोकजी गोरे यांनी केले. संचालन मा. मानकर मॅडम यांनी केले. सेवानिवृत्तीवर गीत प्रकाशजी चौधरी यांनी सादर केले. व आभारप्रदर्शन श्री.रंभाड सर यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री.अशोक गोरे,श्री.यादवरावजी खडसे,श्री.प्रकाश चौधरी व सर्व आजी- माजी मुख्याध्यापक तसेच इंडो पब्लिक स्कूल (state board) चे सर्व कर्मचार्यांनी सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज