Breaking News

*मुक्काम पोस्ट चाकूर* *पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा- एस एम देशमुख*

*मुक्काम पोस्ट चाकूर*

*पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा- एस एम देशमुख*

चाकूर ःसत्ता डोक्यात गेली की, माणूस बेभान होतो. याचे उदाहरण चाकूर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कृतीतून दाखवून दिले.बातमी अधिकारांच्या विरोधात होती, ती आपल्या साहेबांच्या म्हणजे आमदारांच्या विरोधात आहे असे समजून राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते उठले आणि देशोन्नतीचे पत्रकार विकास स्वामी यांच्या कार्यालयासमोर गेले. तेथे त्यांनी धुडगूस घालत देशोन्नती च्या अंकाची होळी केली.कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी स्वामी यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना अर्वाच्च शिविगाळ ही केली.

सदर विषय इथंच संपत नाही तर स्वामी आणि चाकूरच्या चार पाच पत्रकारांनी पोलिसात तक़ार दिली.मात्र पाच दिवस झाले अजून गुन्हा दाखल झालेला नाही.तक्रार अर्ज पोलिसांनी दडवून ठेवल्याचे स्पष्ट दिसुन येते व पोलिसांवर कोणाचा तरी दबाव आहे.म्हणून पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करीत आहेत.राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा आणि पोलिसांच्या निष्क्रीयतेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई निषेध करीत आहे.

राज्यातील पत्रकारांवर पुन्हा हल्ले वाढले आहेत.याचं कारण पत्रकारांच्या तक़ारी पोलीस वेळीच दाखल करून घेत नाहीत आणि घेतल्या तरी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करीत नाहीत. पोलीस दबावाखाली काम करताहेत हे चाकूरच्या घटनेनं पुन्हा दाखवून दिलं आहे.. लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून पत्रकारांच्या विरोधात सुरू असलेली दादागिरी थांबवावी अन्यथा राज्यभर आंदोलन करावे लागेल.असा इशारा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी दिला आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …