*आज टेकाडी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन*
*जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबीराचा लाभ घ्यावा – निलेश गाढवे*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – समाज सुधारक माहात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था व राजे शिव हेल्थ क्लब टेकाडी च्या वर्धापन दिनी संस्थे व्दारे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचा जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान देऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे .

आज शनिवार दिनांक.११ सप्टेंबर २०२१ ला सकाळी ९ ते १ वाजे पर्यंत राजे शिव हेल्थ क्लब, फुले चौक टेकाडी येथे भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन समाज सुधारक माहात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था व राजे शिव हेल्थ क्लब टेकाडी च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ग्रामोन्नती प्रतिष्ठाण, शिवशक्ती अखाडा व युवा चेतना मंच यांचे सहकार्य लाभणार आहे. समाज सुधारक माहात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था व राजे शिव हेल्थ क्लब टेकाडी च्या वर्धापन दिनी आयोजित भव्य रक्तदान शिबीरात परिसरातील युवकांनी उपस्थित राहुन रक्तदान करून आधुनिक युगात रक्तदान करून, गरजुना जिवनदान करण्यास सहकार्य करावे असे आवाहन स सु मा ज्योतीबा फुले बहु. संस्थेचे अध्यक्ष निलेश गाढवे यांनी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज