*कन्हान शहरात हरतालिका उत्सव थाटात संपन्न*
*नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर सह अनेक महिलांनी केले हरतालिकेचे पुजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात हरतालिका उत्सव साजरा केला जात असुन मागील गेल्या दोन वर्षा पासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने शासना च्या नियमाचे पालन करुन शहरात हरतालिका उत्सव थाटात संपन्न करण्यात आला .
हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. या दिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठिण उपवासांपैकी एक मानला जातो. गुरुवार दिनांक ९ सप्टेंबर २०२१ रोजी कन्हान शहरात हरतालिका उत्सव साजरा करण्यात आला असुन वैवाहिक महिलांसोबतच कुमारीका सुद्धा हरतालिकेचा उपवास करतात. हा व्रत केल्यानं मनासारखा जोडीदार मिळतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे कुमारीका सुद्धा हे व्रत करतात.
कन्हान नदी घाटावर महिलांनी केले पुजन
कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या
नगराध्यक्षा सौ.करूणा ताई आष्टणकर यांनी कन्हान नदीच्या काली मंदीर घाटावर हरतालिकेचे पुजन केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत पुजे ला पायल पडोळे, श्रद्धा आष्टणकर, तुलेशा नानवटकर, रिना नागरे, सरिता आपूरकर, नमिता चिंचुलकर, सुनिता आंबागडे, लता लुंढूरे, कल्याणी नानवटकर, अश्विणी भनारे, कविता भनारे, मोनिका बारई, भाग्यश्री कामडी, काजल ठाकरे, शिवानी ठाकरे , रूशाली भनारे, रामादेवी तिवारी, किरन रोकडे, माधुरी ठाकुर सह आदि महिलांनी सुध्दा उपस्थित राहुन हरतालिकेचे पुजन करुन हरतालिका उत्सव थाटात संपन्न करण्यात आला .
Maharashtra News Media सच की आवाज