Breaking News

*उमंग गीताई काँलेज मध्ये न्यूट्रिशन आठवड्याचे आयोजन*

*उमंग गीताई काँलेज मध्ये न्यूट्रिशन आठवड्याचे आयोजन*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

नागपुर:- उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमेन्स एज्युकेशन कोराडी रोड, पांजरा नागपूर मध्ये दिनांक 6 .9 .2021 रोजी न्युट्रिशन आठवडा चे आयोजन राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून केला गेला. या आठवड्याला आयोजित करण्याचा हेतू लोक आपल्या स्वास्थ आणि खानपणाला घेऊन जागृत व्हावे असा होता. या कार्यक्रमाला यश देण्याकरिता चार सुवर्णपदकाचे मानकरी तेजस्विनी जोशी ला आमंत्रित केले होते. जोशी हे पदव्युत्तर पदवी नागपूर विश्वविद्यालय मधून फुड सायन्स अँन्ड न्युट्रिशन मध्ये केले. त्यांनी आपली पीएचडी न्यूट्रिशन मध्ये करून पाच शोध पत्र लिहिली आहे. त्यांनी कार्यक्रम दरम्यान न्यूट्रिशन चे महत्व व संतुलित आहार वयानुसार कशाप्रकारे घ्यायचे असते यांचे महत्व सांगितले.
कोरोना महामारीच्या वेळेत ह्या झूम ॲप द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला या वेबिनार मध्ये सुमारे 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात वैशाली फुले, डॉ अतुल टेकाडे, प्रा. हुस्त्रा झकी, अंकिता वानखडे आणि महाविघालयचे सर्वच विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …