Breaking News

*उमंग गीताई कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला*

*उमंग गीताई कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला*

 

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमन एज्युकेशन पांजरा, कोराडी रोड नागपूर येथे दिनांक 6. 9. 2021 ला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैशाली फुले यांच्या हस्ते शिक्षकतज्ञ व श्रेष्ठ शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कॉलेजचे प्राचार्य डॉ अतुल टेकाडे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व समजून दिले पाच सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. ते प्रतिष्ठित व्दूत, शिक्षणतज्ञ आणि सर्वश्रेष्ठ शिक्षक होते. राष्ट्राचे भविष्य मुलांच्या हातात असते आणि व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी ते आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात सोबतच समाजातील एक चांगला माणूस आणि देशाचे चांगले नागरिक होण्यास सुद्धा या गोष्टी मदत करतात. उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या शिक्षकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः शिक्षक हे शहाणपणाची जाणीव जागृती निर्माण करणारे साक्षर लोक आहेत. म्हणूनच शिक्षक हे संपूर्ण जीवनासाठी विद्यार्थ्यांचे पोषण करून त्यांना तयार करतात व हे आपल्या आयुष्यात विजेच्या दिव्याचे स्त्रोत आहे. आपल्याला शिक्षक हे ज्ञान आत्मविश्वास सुधारण्यात तसेच योग्य मार्ग निवडण्यासाठी आणि शुद्ध होण्यासाठी मदत करतात. शिक्षकाच्या नेहमीच आदर केलाच पाहिजे म्हणून वर्षातून एकदा तरी त्यांचे आभार मानले आपले कर्तव्य आहे. कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद प्राध्यापक गौरव गजबे, प्रा. हुस्त्रा झकी, प्रा.रोशनी डहारे, प्रा. रश्मी उइके, प्रा. जानवी नंदनवार प्रा. प्रीती मानकर,
तसेच सहकर्मचारी निलेश मेश्राम, पवन करमेले, मधुकर डांगे, दर्शना, वंदना यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …