*खापरखेडा ह्दीतील चन्कापुर वेकोली परिसरात विज पडल्यांने दोन युवक जागीच ठार तर एक युवक गंभीर जखमी*
*दोन फुटबाँलपटू जागीच ठार;तिसरा गंभीर जखमी*
*गणेश स्थापनेच्या दिवशीच काळाची झडप*
*मृतक दोघेही महाविघालयीन विघार्थी*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपुर:- एकीकडे गणेश चतुर्थी धुम असताना तर खापरखेडा येथील चन्कापुर वेकोली काँलनीत अंगाला शहारे येणारी घटना घडली. खापरखेडा पासून काही अंतराव असलेले चन्कापुर वस्ती येथे प्रसिध्द हनुमान मंदीर असून तेथील हनुमान मंदीर समोर खेडाळू करिता मोठे मैदान असून येथे विविध खेळ मुल मुली खेळतात तसेच युवक पोलीस भर्ती, आर्मी भर्ती करिता तयारी करतात व कोळसा खाणीत काम करणारे कर्मचारी त्यांचा परिवार सकाळी माँनिर्ग वाँक करिता प्रचंड गर्दी करतात. मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने खेडाळू प्रेमींना खेळण्याचा मोह आवरता आला नसून दुपारी 4 ते 5 च्या दरम्यान खापरखेडा परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले चन्कापुर परिसरातील काही नवयुवक फुटबाँल खेळण्याकरिता मैदानात आले व भरपावसात फुटबाँल खेळू लागले असता जोरदार पाऊस व कडकडत्या विजेचा चमकने फुटबाँल खेळत असलेले मुलानवर विज पडली असता विजेच्या धक्याने दोन मुल जागीच जळून ठार झाले असता एक मुलगा गंभीर जखमी आहे.
मृतकाचे नाव-१)तन्मय सुनील दहिकर (18) राहणार चन्कापुर २) अनुज कुशवाह (21) राहणार चन्कापुर तर
गंभीर जखमीचे नाव-सक्षम सुमित गोतीफोडे(13) रा पाचपावली नागपूर असे आहे.
या घटनेत तन्मय व अनुजचा जागीच मृत्यु झाला. सक्षम गंभीर जखमी झाला असून घटनेची माहिती चनकापुर , खापरखेडा परिसरात वा-यासारखी पसरली. पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी यांनी खापरखेडा पोलीसांना माहिती देत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले. दोघांना तपासून डाँक्टरांनी मृत घोषित केले. सक्षमवर शासकीय मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते़