*ब्रेकींग न्यूज़*
*श्री क्षेत्र झुंज येथे नाव उलटून सात आठ लोकांचा बुडून मु्त्यू*
*गावकऱ्यांनी शोधुन काढले दोन वर्षाच्या चिमुकलीसह तीन म्रुतदेह*
*उपविभागीय अधिकारी हिंगोले, ठाणेदार सरकटे, व तलाठी घटनास्थळी दाखल*
वरुडः वर्धा नदीच्या पाञात श्री क्षेत्र झुंज येथे एक नाव पलटल्याने सात आठ जण बुडाल्याची धक्कादायक घटना पुढे येत असुन सद्या स्थितीत तिघांचे शव सापडल्याचे वुत्त आहे त्यात गाडेगावचा नाव चालक,दोन वर्षाची लोणी येथील मुलगी, व एक गाडेगावची महिला असल्याचे माहिती मिळाली आहे.
*सदर दुर्दैवी घटनेसंदर्भात मिळालेली माहिती अशी की आज दिनांक १४ सप्टेंबर ला दुपारी ११ वाजता झुंज येथे फिरण्यासाठी आले होते व त्यांनी नौकानयनाची मौज म्हणुन सात आठ लोक नावेत बसले असल्याचे वु्त्त असुन अचानक नाव पलटल्याची दुर्दैवी घटना घडली. रेस्क्यु टिम येण्यापूर्वी गावातील लोकांनीच नदीपाञात म्रुतदेह शोधून काढले हे विशेष तर इतर शव शोधण्यासाठी अथक परिश्रम घेण्यात येत असुन घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितिन हिंगोले, बेनोडा पोलिस स्टेशनचे ठाणेदाराचे सरकटे तलाठी एस के गोलवाल पोहोचले असुन तपास कार्य करीत आहे*
*शव शोधून बाहेर काढण्यासाठी रेस्कु टीमला पाचारण करण्यात आले आहे*