*कैबिनेट मंत्री सुनिल केदार यांनी खापरखेडा मध्ये घेतले श्रीमहालक्ष्मी मातेचे दर्शन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि दिलीप येवले
नागपुर:- तीन दिवस चालणा-या श्रीमहालक्ष्मीपूजनाची सुरूवात रविवारी गौराईच्या सोनपावलांनी झाली. दुस-या दिवशी सोमवारी श्रीमहालक्ष्मीला नैवेघ दाखविण्यात आला. सुखसमृध्दीचे प्रतिक असलेल्या श्रीमहालक्ष्मीच्या पूजनाची अनेकांकडे वर्षानुवर्ष परंपरा आहे. त्यानिमित्त राज्याचे पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी खापरखेडा येथिल वार्ड क्रमाक 2, दत्ता शिंदे यांच्या निवासस्थानावर जाऊन श्रीमहालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले याप्रसंगी खापरखेडा पावर फ्रंन्ट संघटनेचे अध्यक्ष भुपेंद्र चतुवैदी, अनिल बोरकडे, प्रविण हाते, प्रविण लांजेवार, महेश फुलझेले, नंदू शाहू, गोपाल गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.