*कन्हान येथे काली मंदिर नदी काठावर नगर परिषद प्रशासना ने गणेश विसर्जनाची केली व्यवस्था*
*सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती काली मंदिर नदी काठावर विसर्जन करावे – नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात गणेश महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येते . परंतु राज्या सह नागपुर जिल्ह्यात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षापासुन कोरोना चे प्रार्दुभाव वाढल्याने शहरात व परिसरात शासनाच्या नियमाचे पालन करुन गणेश महोत्सव साजरा करण्यात येत असुन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना द्वारे काली मंदिर नदी काठावर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असुन सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती काली मंदिर नदी काठावर विर्सजन करावे असे कडकडीचे आव्हाहन नगर परिषद नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी नागरिकांना केले आहे .
कन्हान शहरात व परिसरात शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर ला श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी बप्पाची ठिकठिकाणी सार्वजनिक मंडपात व घरोघरी स्थापना करण्यात आली असुन सार्वजनिक मंडपात सकाळी व सायंकाळी होणाऱ्या आरती शिवाय कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता कोरोना काळातील शासना च्या नियमाचे पालन करुन शहरात व परिसरात गणेश महोत्सव साजरा करण्यात येत आहे .
नगर परिषद प्रशासना ने काली मंदिर नदी काठावर गणेश विसर्जना ची केली व्यवस्था
जिल्ह्यात व शहरात गेल्या काही दिवसान पासुन सतत पाऊस सुरु असल्याने कन्हान नदी तुडुंब भरुन वाहत असल्याने येणाऱ्या १९ सप्टेंबर व २० सप्टेंबर ला गणेश विसर्जन च्या पुर्व नियोजन करण्याकरिता नगर परिषद प्रशासन व कन्हान पोलीस प्रशासना ने सोमवार दिनांक १३ सप्टेंबर ला काली मंदिर नदी काठावर जाऊन स्थिती चा आढावा घेतला असुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असुन मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर ला कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन बैठकी मध्ये विविध विषयांवर चर्चा करुन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले . या बैठकी नंतर नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी सांगितले कि आगामी रविवार दिनांक १९ सप्टेंबर ला व २० सप्टेंबर ला काली मंदिर नदी काठावर नगर परिषद द्वारे गणेश विसर्जन करण्या करिता संपुर्ण व्यवस्था करण्यात आली . तसेच नदी काठावर लाईट्स , कुत्रिम टैंक व इतर व्यवस्था करण्यात आली असल्याने शहरातील नारिकांनी सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती काली मंदिर नदी काठावर विर्सजन करावे . असे कडकडीचे आव्हाहन नगर परिषद च्या नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी नागरिकांना केले आहे .
या बैठकी मध्ये ढिवर समाज संघटनेचे अध्यक्ष सुतेश मारबते , राजु मारबते , मोहन वाहिले , रेखा भोयर धर्मराज खंटाटे , रवि केवट , प्रशांत मसार , बंडुजी केवट , डेकोरेशन व्यवस्थापक महादेव लिल्हारे , अजय चव्हान , प्रदीप गायकवाड , सह आदि नप अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज