*पारशिवनी तालुक्यात गणेश उत्सव मंदावला*
*जि.प अध्यक्ष रश्मी बर्वे व माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी केले गणपतीचे दर्शन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी – पारशिवनी तालुक्यात , कन्हान शहरात व परिसरात गणेश उत्सव दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो . परंतु गेल्या दोन वर्षा पासुन राज्यात, जिल्ह्यात व ग्रामीण भागात कोरोना चे थैमान चांगलेच पसरल्याने या उत्सवावर पाणी फेरले असुन सद्या च्या परिस्थिती मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसर्या लाटेची धास्ती असल्यामुळे अनेकांकडून काळजी घेतली जात असुन त्याचाच परिणाम गणेशोत्सवातील उत्सवावरून दिसून येत आहे.
पाराशिवनी तालुक्यातील कन्हान शहरात , पाराशिवनी शहरात व जवळपास च्या ग्रामीण भागात यावर्षी जवळपास ३० सार्वजनिक मंडळाच्यावतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असुन शासन , प्रशासनाने निर्बंध घातल्यामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये बाप्पांची स्थापना करण्यात आली असुन जोपर्यंत कोरोना पुर्णत: हद्दपार होणार नाही तोपर्यंत सर्वांना नियमांचे पालकन करणे , मास्क , सेनिटाइजर , व सोशल डिस्टेंन्स चे पालन करने व गणपती मंडळाच्या मंडपातही प्रशासनाने आरती शिवाय अन्य कार्यक्रमा वर बंदी घातली असुन कुठलेही संस्कृति , खेळ स्पर्धा चे आयोजन करु नये असे कडकडीचे आव्हाहन स्थानिक प्रशासन ने केले आहे .
जि.प अध्यक्ष रश्मी बर्वे व माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी केले गणपतीचे दर्शन
टेकाडी जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत कोयला खदान दया नगर येथे श्री गणेश भगवान चे दर्शन करण्याचे व देवांची आरती करण्याचे सौभाग्य जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मीताई श्यामकुमार बर्वे व ग्राम पंचायत उपसरपंच बबलू भाऊ बर्वे यांना प्राप्त झाले ।या प्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी,सन्मानीय सदस्य, भविक भक्त ,व नागरिक उपस्थित होते .
तसेच रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री मल्लिकार्जुन रेड्डी यांनी भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर सह अनेका लोकांन कडे जाऊन गणपती चे दर्शन घेतले व आरती करुन आशिर्वाद घेतला . व गणपती महोत्सवा च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या .