*जिल्हा परिषद पोटनिवडणुका तात्काळ रद्द करण्याची मागणी* *भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत राज्य निवडणुक आयोगाला निवेदन*

*जिल्हा परिषद पोटनिवडणुका तात्काळ रद्द करण्याची मागणी*

*भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत राज्य निवडणुक आयोगाला निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्र राज्य शासनाच्या बेजबाबदार पणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजपा पारशिवनी तालुका ओबीसी आघाड्यांचा पदाधिकार्यांनी कन्हान तारसा चौक येथे राज्य शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करुन तहसीलदारा मार्फत राज्य निवडणुक आयोगाला निवेदन पाठवुन तात्काळ जिल्हा परिषद पोटनिवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे .
महाविकास आघाडी राज्य शासनाच्या बेजबाबदार पणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले असुन राज्य शासनाने न्यायालयात योग्य पद्धतीने बाजु मांडली नसल्याने आता ओबीसीं च्या आरक्षण शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिति च्या पोटनिवडणुका होत असल्याचा निषेधार्थ कन्हान तारसा चौक येथे भाजपा पारशिवनी तालुका ओबीसी आघाड्यांचा पदाधिकार्यांनी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री श्री रामभाऊ दिवटे यांच्या नेतृत्वात व भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा पारशिवनी तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष नरेश पोटभरे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , तसेच भाजपा कन्हान शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमोल साकोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राज्य शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करुन पारशिवनी तालुका तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्फत राज्य निवडणुक आयोगाला निवेदन पाठवुन तात्काळ जिल्हा परिषद पोटनिवडणुका रद्द करण्याची मागणी करण्यात आली .


या प्रसंगी या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , कमलाकरजी मेंघर , भाजपा ओबीसी पारशिवनी शहर अध्यक्ष डॉ प्रमोद भड , हर्षद भाई , राजु भोयर , देवानंद शेंडे , सागर सहारे , भाजपा पारशिवनी तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष नरेश पोटभरे , जिल्हा महामंत्री जयराम मेहरकुळे , राजेश ठाकरे ,भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष अमोल साकोरे , जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे , कामेश्वर शर्मा , राजेंद्र शेंदरे , अजय लोंढे , संकेत चकोले , संजय रंगारी , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , रुषभ बावनकर , सचिन वासनिक , धर्मेंद्र गणवीर , अमन घोडेस्वार , विनोद कोहळे सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …