*गणेश विसर्जन च्या दिवशी नदी काठावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्याची मागणी*
*कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांचे पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासना ला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – नागपुर जिल्ह्यात व ग्रामीण भागात होत असलेल्या सतत पावसा मुळे नदी – नाले तुडुंब भरुन वाहत असल्यामुळे गणेश विसर्जन च्या दिवशी नदी काठावर कोणतीही घटना नाही घडायला पाहिजे या करिता कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते यांची भेट घेऊन व या विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन गणेश विसर्जन च्या दिवशी नदी काठावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे .
नागपुर जिल्ह्यात व ग्रामीण भागात मागील काही दिवसान पासुन जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे कन्हान नदी दुथळी भरुन वाहत असल्यामुळे याच महिन्याचा ५ सप्टेंबर ला जुनी कामठी गाडेघाट येथील अम्माचा दर्गा येथे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातुन दर्शनासाठी आलेल्या पाच युवकांचा कन्हान नदी पात्रात बुडुन मृत झाल्याची अत्यंत र्दुदैवी घटना घडली असुन वर्धा जिल्यातील नदी पात्रात नाव पलटल्याने एकांच परिवारातील ११ जणांचा मृत्यु झाला असुन सध्याचा परिस्थिति मध्ये पावसाचे सत्र सुरु असुन कन्हान नदी दुथळी भरुन वाहत असुन येणाऱ्या रविवार १९ सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी होऊ घातली असुन कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना द्वारे सत्रापुर नदी काठावर गणेश विसर्जन करिता कुत्रिम तालाब , लाईट्स ची व्यवस्था , व इतर व्यवस्था करण्यात आली असुन कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते यांना भेटुन व चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन गणेश विसर्जन च्या दिवशी कन्हान नदी काठावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , कामेश्वर शर्मा , प्रशांत मसार , हरीओम प्रकाश नारायण , विनोद कोहळे , अक्षय फुले , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .