*चालक दिन उत्साहात साजरा*

*महामार्ग पोलीसांनी चालकांना दिल्या महत्त्वपुर्ण सुचना*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा घटक चालक असून त्यांची अन्यनसाधारण भूमिका आहे . देशाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदानाबाबत चालक या घटकाचे गुणगौरव करण्याच्या दृष्टीने दरवर्षी १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून घोषित करण्यात आल्याने , सर्व वाहन चालकाना शुभेच्छा व पुष्पगुच्छ देवून चालक दिन साजरा करण्यात येतो .


*सदर कार्यक्रमाकरीता मा.अपर पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य , मुंबई तसेच मोटार मालक वाहतुक संघटना , महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी तर्फे सुध्दा आज दिनांक १७ / ० ९ / २०२१ रोजी वेळ ११/३० ते १४/०० वा . पावेतो महामार्ग पोलीस केंद्र , पाटणसावंगी ( हेटी ) त.सावनेर जि . नागपूर येथे १५ २० वाहन चालक तसेच सावनेर येथील राज्य परिवहन विभाग , येथील आगार व्यवस्थापक श्री . रामटेके यांच्या उपस्थितीत १५ ते २० वाहन चालक त्याच प्रमाणे नागपूर -पाढुर्णा रोड वरील वाहेगुरु धाबा येथील धाबा मालक श्री . अरविंद शेंभेकर यांच्या उपस्थितीत १० ते १५ वाहन चालक यांना पुष्पगुच्छ तसेच गुलाबाचे फुल देवून चालक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या . तसेच त्यांना आवश्यक विविध विषयावर मार्गदर्शन पर प्रबोधन तसेच मोटार वाहन नियमांबाबत जनजागृती पर सर्वसमावेशक उपयोगी कार्यक्रम घेवून चालक दिन साजरा करण्यात आला .*

*सदरचा कार्यक्रम मा . डॉ . श्री . भुषणकुमार उपाध्याय , अपर पोलीस महासंचालक ( वाहतुक ) महाराष्ट्र राज्य , मुंबई , श्रीमती श्वेता खेडकर , पोलीस अधीक्षक , महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर , तसेच श्री.संजय पांडे , पोलीस उप अधीक्षक , महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर , श्रीमती वैशाली वैरागडे , पोलीस निरीक्षक , महामार्ग पोलीस नागपूर विभाग यांच्या मार्गदर्शनात श्री.सचिन मत्ते , सहा . पोलीस निरीक्षक तथा प्रभारी महामार्ग पोलीस केंद्र , पाटणसावंगी , श्री . नरेंद्र गौरखेडे , पोलीस उप निरीक्षक , श्री . आनंदकुमार खंडारे , पोलीस उप निरीक्षक , महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी , सपोउपनि / कैलास लिपटे , नापोशि / निलेश अंबरते , नापोशि / दिपक पाचपोर , नापोशि / रविंद्र रडके , चानापोशि / अनिल जांभेकर , पोशि / मंगेश भालेराव सर्व नेमणूक महामार्ग पोलीस केंद्र पाटणसावंगी यांनी पार पाडला .*
Maharashtra News Media सच की आवाज