*बोरडा सराखा येथे कोविड -19 लसीकरण शिबिर संपन्न*

*अनेक लोकांनी केले लसीकरण*
रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – गट ग्राम पंचायत कार्यालय, बोरडा अंतर्गत आरोग्य उपकेंद्र,बोरडा येथे कोविड-19 विषयी मनसर PHC तर्फे लसीकरण शिबिर घेण्यात आले.त्याच्या अगोदरच्या दिवशी गट ग्राम पंचायत बोरडा कडून सराखा,सत्रापुर,बोरडा तसेच देवळी या गावात दवंडीद्वारे व रॅली काढून जनजागृती करण्यात आली होती.या केलेल्या जनजागृतीमुळे अनेक लोकांनी या लसीकरण शिबीर कार्यक्रमात उत्स्फूर्त पध्दतीने भाग घेतला.8 सप्टेंबर रोजी आरोग्य उपकेंद्र, बोरडा येथे लसीकरण करून घेण्यासाठी अनेक लोकांची उपस्थिती असल्याचे चित्र निदर्शनास आले होते.खूप मेहनत घेऊन देखील 8 सप्टेंबर रोजी एकूण 227 लोकांचे लसीकरण करण्यात डॉक्टरांची टीम यशस्वी झाली.वेळेचा भान ठेवून काही उर्वरित लोकांना शनिवार दि.11 सप्टेंबर ला आरोग्य उपकेंद्र बोरडा येथे येऊन लसीकरण करून घेण्यास सांगितले.त्यावेळी 11 सप्टेंबरला देखील लसीकरणासाठी अफाट गर्दी करून 124 लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे समजते..लोकांनी लसीकरणाचे महत्व समजून त्यास योग्य असे प्रतिसाद देत गावाचे नाव लौकिक केल्याचे समजते. उर्वरित सर्व गावकऱ्यांनी देखील लसीकरण करून घ्यावे व स्वतःचे आणि स्वतःच्या परिवाराचे संरक्षण करावे.अशा काही सूचना ग्राम पंचायत कार्यालयातर्फे गावकऱ्यांना देण्यात आल्या.यावेळी डॉ.मयुर निपाने, आरोग्य सेविका.प्रगती बद्रे,आशा गतप्रवर्तक सौ.छाया दोडके,आरोग्य सेवक श्री.टोंगसे सर,जि.प.उ.प्रा.शाळा बोरडा येथील शिक्षक श्री.वासाडे सर,गफ्फार कुरेशी सर,आरोग्य सेविका.मीना फरकांडे,आशा वर्कर संगीता लांजेवार,शीला डडमल,प्रिया गजबे,मालती गजबे,उषा शेंडे,शकुंतला लेंडे तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गजबे,निलेश नारनवरे,सुरेंद्र डडमल,रवींद्र चौधरी आदी सर्व उपस्थित होते.प्राप्त झालेल्या माहितीनुसार गावातील अंदाजे जवळपास 60 ते 70% लोकांचे लसीकरण पूर्ण होऊन उर्वरित लोकांचे लसीकरण बाकी असल्याचे समजते.
Maharashtra News Media सच की आवाज