Breaking News

*मुदुकृष्णापूर येते प्रधानमंत्री जण आरोग्य योजना आयुष्यमान कार्डचे वाटप*

*मुदुकृष्णापूर येते प्रधानमंत्री जण आरोग्य योजना आयुष्यमान कार्डचे वाटप*

 

गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गड़चिरोली  – गडचिरोली जिल्हा सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत पेंटीपाका हद्दीतील मुदुकृष्णापूर या गावात
23 सप्टेंबर 2021 रोजी आयुष्यमान भारत योजनेचा तिसरा वर्धापनदिन निमित्ताने 15 दिवस मोहीम जिल्हाभर योजनेची जनजागृती व कार्ड वितरण कार्यक्रम घेण्यात येत आहे, त्या निमित्ताने आज दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोज रविवारला उपसरपंच तथा भाजपा तालुका अध्यक्ष सिरोंचा – शंकर नरहरी,गावाचे पोलिस पाटील प्रभाकर माणिकरौतु, योजनेचे जिल्हा पर्यंवेक्षक – मनोज उराडे यांच्या हस्ते UTI अंतर्गत कार्ड वाटप करण्यात आले.
केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी ,आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना या योजनेला मोदी केअर या नावाने ओळखले जाते, ही योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून संपूर्ण भारतात सुरू झालेली आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांला प्रति वर्ष प्रति कुटुंब ५ लाखा पर्यंत 1207 आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार मोफत आहेत. त्या करिता लाभार्थ्यांचे नाव सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणना २०११ मध्ये नाव असणे आवश्यक आहेत.तसेच त्याचा कडे प्रधानमंत्री पत्र पाठविलेले आहेत. हे पत्र किंवा रेशन कार्ड सोबत ओळख पत्र च्या आधारे आयुष्यमान भारत कार्ड त्या लाभार्थ्यांला बनवायचे असते. या मुळे सर्व दुर्गम,गरीब,असुरक्षित लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.त्या करिता कार्ड बनविण्यात आयुष्यमान भारत मदत केंद्र, UTI केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तरी गरजू लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आयुष्यमान भारत कार्ड बनवावे, असे आवाहन उपसरपंच तथा भाजपा तालुका अध्यक्ष सिरोंचा श्री.शंकर नरहरी यांनी केले आहे.त्यावेळी उपस्थित गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …