*लोककल्याण युवा मंचने केले निर्माल्य व्यवस्थापन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि – दिलीप येवले
नागपुर : लोककल्याण युवा मंच व ग्रामपंचायत कोराडीच्या वतीने कोराडी तलाव येथे विसर्जित करण्यात आलेल्या निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यात आले . मंचाच्या सहकार्याने विसर्जनासाठी आणलेले पूजेचे साहित्य व निर्माल्य गोळा करण्यात आले . मंचच्या सदस्यांनी भाविकांना पाणी प्रदूषण आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जागृत केले . युवा मंच आणि ग्रामपंचायतच्या सहकार्यातून जमा झालेल्या निर्माल्याचे कंपोस्ट खत तयार करण्यात येते . यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह लोककल्याण युवा मंचचे अध्यक्ष लुकेश व-होकर , सचिव रितेश मैद , निखिल फुलझेले , देवेंद्र नवधिंगे , राहुल वाटकर , धर्मराज गौरकर , देवेंद्र माडे, स्वप्नील चौहान, वैष्णव माडे , मोहन कोढे , क्रीष्णा घाटोळे, कपिल वाटकर, गौरव घाटोळे, , सारंग फुलझेले,निकेश बागडे , तुषार आरेवार, राजा उईके, गणेश मेश्राम,मयूरेश डेहाडराय , रिक्की श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज