*गोंडवाना गणतंत्र पार्टी कार्यकारणी घोषित*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – गोंडवाना गणतंत्र पार्टी ची नागपुर जिल्ह्यातील कन्हान शहरात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ओबीसी मोर्चा, अनुसुचित जाती प्रदेश अध्यक्ष व कन्हान शहराची नविन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
नुकतिच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुखलाल मडावी यांचे रायनगर कन्हान येथील कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरीशजी उइके यांचे अध्यक्षेत व महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष महेश बम्हनोटे, नागपुर जिल्हाध्यक्ष धनराज मंडावी, जिल्हा पदाधिकारी राम लाल पट्टा, राजेश टेकाम यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये आदीवासी समाज बांधवाचे होणारे शोषण व गोंडवाना गणतंत्र पार्टी वाढविण्याच्या दुष्टीने बैठकीत विचार विमर्स, चर्चा करून ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी सचिन दहीकर, अनुसूचित जाती महाराष्ट्र अध्यक्ष पदी कामठीचे गणेश पाटील, नागपुर जिल्हा संपर्क प्रमुख सर्जेराव सय्याम, उमरेड तालुका अध्यक्ष देविदास सिडाम यांची नियुक्ती करण्यात आली . आणि कन्हान शहराची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात कन्हान शहर अध्यक्ष सोनु अरविंद मसराम, उपाध्यक्ष प्रकाश मडावी, सचिव विरेंद्रसिंग मरकाम, महासचिव महादेव उइके व कन्हान शहर महिला अध्यक्ष मायाताई कोराम आदि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत महिला अध्यक्षा पारशिवनी तालुका वंदना भलावी, उपाध्यक्षा पारशिवनी अर्चना आहाके, संदिप परते, शंकरदादा इनवाते सह गोंगपा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज