*नागपूर पदवीधर मतदार नोंदणी मोहीमेला उदंड प्रतिसाद*

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ व संघर्ष वाहिनी तर्फे आयोजन
मतदार नोंदणी मोहीम अंतर्गत 397 सभासदांची नोंदणी

नागपूर – नागपूर पदवीधर मतदार संघातील नव्याने करण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहीम उदंड प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी तब्बल 397 मतदार नोंदणी फाॅर्म भरून घेण्यात आले.
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) व संघर्ष वाहिनी तर्फे मतदार नोंदणी संघर्ष वाहिनी कार्यालय, नागपूर येथे करण्यात आली. या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण टास्क फोर्स कमेटिचे सदस्य दिनानाथ वाघमारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संस्थापक मिलिंद वानखेडे, साकोली खंडविकास अधिकारी सुनील तडस, दै सकाळचे उपसंपादक अतुल मेहरे उपस्थित होते.
यावेळी मतदार नोंदणी अभियानांतर्गत अधिकाधिक पदवीधरांनी मतदान नोंदणी करावी असे आवाहन केले.
विशेष म्हणजे या मतदार नोंदणीत एकाच दिवशी तब्बल 397 मतदारांची नोंदणी केली.
या मतदार नोंदणीसाठी विभागीय सचिव खिमेश बढिये, जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, शहर संघटक रविकांत गेडाम, माध्यमिक महिला संघटक पुष्पा बढिये, काॅग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय धरममाळी, काॅग्रेस मुख्याध्यापक सेलचे अध्यक्ष प्रकाश भोयर, सुखदेव कोल्हे यांच्यासह पदवीधर व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज