Breaking News

*गोंडेगाव जिल्हा परिषद द्वारे पीएम नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस रक्तदान शिबीराने थाटात साजरा* *२४ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*गोंडेगाव जिल्हा परिषद द्वारे पीएम नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस रक्तदान शिबीराने थाटात साजरा*

*२४ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – भाजपा व गोडेंगाव जिल्हा परिषद क्षेत्रा द्वारे देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेता व सदस्य व्यंकटेश कारेमोरे , भाजपा पारशिवनी तालुका महिला अध्यक्ष सरिता लसुंते यांनी केले असुन या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते व भाजपा नागपुर ग्रामीण सचिव श्री जयराम मेहरकुळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले असुन या प्रसंगी केक कापुन व मिठाई वाटप करुन रक्तदान शिबीर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असुन या


रक्तदान शिबीरा मध्ये २४ रक्तदात्यांनी रक्तदान करुन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला . या क्रार्यक्रमाची
प्रास्ताविका भाजपा पारशिवनी तालुका महामंत्री पंकज गोंडाने यांनी मांडली असुन संचालन प्रणय खवले तर आभार विलास लसुंते यानी मानले . शिबिर यशवी करण्याकरिता पंचायत समिति सदस्य नरेश मेश्राम , गोंडेगाव ग्रामपंचायत सरपंच नितेश राउत ,धर्मेन्द्र गणवीर , सतीश वाड़ीभस्मे , अनिल उके , सुनील धुरिया ,शालिनी बर्वे ,आरती वगारे , विनोद कोहड़े सह आदि ने सहकार्य केले .
प्रितम सिंग,अवेंद्र सिंग, शुभम पाली, महेंद्र वैद्य, लक्ष्मीकांत ढेंगे, विलास बालकोटे, विनय पाली, संतोष पाली, शेख हबीब, विकास वाडीभस्मे, ज्ञानेश्वर मोहने, संजय कात्यानी, शुभम पाली, जगदीश बाळकोते, प्रणय खवले यांनी रक्तदान केले .
कार्यक्रमाला भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, रेखा ताई दुनेदार , लतेश्वरी काड़े ,पुर्णिमा दुबे ,सुषमा चोपकर ,शिवाजी चकोले, धनराज श्रीसागर , बोर्डा ग्रामपंचायत सरपंच मनोहर डडूरे , सुषमा मस्के , राजेन्द्र शेंदरे , स्वाति पाठक , वर्षा लोंडे, वंदना कुरुडकर , हर्षाली नागपूरकर , तुलेषा नांनवटकर ,अजय लोंडे , मनोज कुरडकर , ऋषभ बावनकर , रोटित कात्यानी ,गोविदा चोपकर , तुकाराम बंड ,शुकाशू मेहरकुळे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

*कांन्द्री येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस निमित्य स्वच्छता दुतांचा सत्कार*

कांन्द्री – कन्हान येथे शुक्रवार दिनांक .१७ सप्टेंबर ला राष्ट्रनेता,देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्र_मोदी यांचा वाढदिवस देशभरात ‘सेवा सप्ताह’ साजरा करत असून याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी कन्हान-कान्द्री च्या वतीने कान्द्री येथील गांधी चौकात केक कापून स्वच्छता दूत सतीश मधुमटके, राकेश मेथीया, संदीप खरे,संतोष मधुमटके,किशन मेथीया,दिनेश मेथीया,गब्बर इंगोले,विधीलाल डहारे,मनोज मधुमटके,विनायक आकरे यांचा दुपट्टा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे रामभाऊ दिवटे,भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे,भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, भाजपा ओबीसी आघाडी मंडळ अध्यक्ष नरेशजी पोटभरे,भाजपा मंडळ उपाध्यक्ष शिवाजी चकोले,कामेश्वर शर्मा,भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष सौ.शालिनीताई बर्वे,नगरसेवक राजेंद्र शेंदरे,सुनील लाडेकर,अमोल साकोरे , सौ.अरुणा हजारे , रिंकेश चवरे , शैलेश शेळके , राहुल वंजारी , सौरभ पोटभरे , प्रशांत देशमुख , विनोद कोहळे , पारस यादव , अमन घोडेस्वार ,स्वाती पाठक , पौर्णिमा दुबे , तुलेशा नानवटकर , सुषमा मस्के , वासुदेव आखरे , चंद्रकांत बावणे , अमरदीप कापसे , सुरेंद्र पोटभरे , प्रवीण हिंगे , इंद्रपाल सुखदेवे , किशोर वाहणे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …