*किशोर गेडाम यांची जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती*
*बहुजन समाज पार्टी च्या पदाधिकार्यांनी केले सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कामठी – बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा प्रभारी पदावर किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांची निवड झाल्याबद्दल कामठी विधानसभा क्षेत्राच्या वतीने त्यांचे पुष्प गुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी नागपूर जिल्हा प्रभारी विजय कुमार डहाट, स्टार प्रचारक मोहम्मद शफी, कामठी विधानसभेचे इन्चार्ज व जिल्हा सचिव चंद्रशेखर पाटील, कामठी विधानसभेचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त रंगारी, बसपा नागपूर जिल्हा महिला विंगच्या सचिव मायाताई उके, कामठी विधानसभा महिला विन च्या अध्यक्षा प्रतिभाताई नागदेवे, कामटी शहर महिला विंग अध्यक्षा सुनीताताई रंगारी, कामठी शहर अध्यक्ष विनय उके, रामभाऊ कुर्वे, प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा प्रभारी किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब म्हणाले की माझ्ं कोणी स्वागत वगैरे अशा प्रकारे कधीही केले नाही. मला कोणी चांगल म्हणत नाही. जे कधी काही ही बोलत नाही, शांत राहतात लोकं त्यांना चांगल्या व्यक्तीची संध्या देतात. या व्यक्ती सारखा चांगला कोणी नाही असे म्हणतात. परंतु जे बोलतात ते सगळ्यांसाठी वाईट असतात त्यापैकी मी एक आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये निष्ठावान, प्रामाणिक ,चांगल्या लोकांचे संघटन आपल्याला उभं करायचे आहे. असे ही नागपूर जिल्ह्याचे प्रभारी किशोर गेडाम व भाऊसाहेब म्हणाले. आपल्या नियुक्तीबद्दल बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुश्री .एड. कुमारी मायावतीजी, राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आकाश आनंद, राज्याचे प्रभारी राज्यसभा खासदार रामजी गौतम, पूर्व खासदार एड. वीरसिंह, प्रमोद रैना, राज्याचे अध्यक्ष एड. संदीप ताजणे यांचे आभार मानले .कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन कामठी विधानसभेचे महासचिव अशोक गजभिये यांनी केले. तर कामठी शहराचे अध्यक्ष विनय उके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कामठी शहराचे महासचिव निशिकांत टेंभेकर , ज्ञानेश्वर उके, मारोतराव गजभिये, विशाल गजभिये, दिलीप नागदेवे, आदिंनी अथक परिश्रम केले.
Maharashtra News Media सच की आवाज