*कन्हान येथे स्वर्ग.श्री धर्मदास भिवगडे यांना दिली श्रद्धांजली*

*विदर्भ शाहीर कलाकार परिषदे व्दारे अध्यक्ष स्व.श्री भिवगडे यांना श्रद्धांजली अर्पण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – विदर्भ शाहीर कलाकार परिषद च्या ग्रामिण पारंपारिक लोककलावंता च्या वतीने हार्दिक मंगल कार्यालय कन्हान येथे श्रध्दाजंली कार्यक्रमाचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजन करून विदर्भातील लोक कलावंतानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्ग.श्री धर्मदास भिवगडे यांना भावभिन श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
शालेय जिवनापासुन नाटय कलावंत म्हणुन सुरूवात करून नाटयकर्मी पर्यंत मजल गाठत असतांना विदर्भातील लोककला ही लोप पावत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आल्याने त्यांचे मुळ कारण शोधत असतांना त्यांच्या लक्षात आले की, पारंपारिक लोककला जोपासणारा ग्रामिण भागातील लोक कलावंत असुन त्याचीच दैनाअवस्था होत असल्याने विदर्भातील पारंपारिक लोककला ही मागे पडुन लोप पावत होती. हेच शल्य जाणुन पारंपारिक लोककला जोपासण्याकरिता ग्रामिण लोककलावंताना जगवावे लागणार या सार्थ हेतुने धर्मदास भिवगडे यांनी १२ ऑगस्ट २००७ ला विदर्भ कलाकार परिषदेची स्थापना करून खेडोपाडी, गावोगावी फिरून सुप्त व निरस्त अवस्थेत असलेल्या कलावंताना एकत्र करून त्यांच्या कलेचे महत्व त्यांना सांगुन आधुनिक काळानुरूप ग्रामिण लोककलेचे सादरीकरणा विषयी योग्य मार्गदर्शन करून शासन दरबारी पारंपारिक लोककला जोपसण्याकरिता ग्रामिण लोक कलावंताना प्रशिक्षण व प्रोत्साहित करून संधी सरकार तर्फे उपलब्ध करण्याकरिता कलावंताच्या समस्येचा रेटा लावुन लोक कलावंताना न्याय मिळवुन देण्याचा सतत लढा देत लोककलावंताना त्याच्या हक्काची जाणीव करून संधी व प्रोत्साहनपर मानधन मिळवुन देण्यास विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या माध्यमातुन मौलिक कार्य केल्याने विदर्भातील लोक कलावंत उभा होऊ लागल्याने व नवसंजिवीनी मिळाल्यामुळेच विदर्भ शाहीर कलाकर परिषदेच्या ग्रामिण लोक कला वंतानी कृत्यज्ञत: म्हणुन स्वर्ग श्री धर्मदास भिवगडे यांचा श्रध्दाजंली कार्यक्रम हार्दिक मंगल कार्यालय कन्हान येथे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा.श्री सुनील बाबु केदार , जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मीताई बर्वे , पंचायत समिति सभापती मिनाताई कावळे, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, कामगार नेते एस क्यु जामा, सुनिल रावत, कॉग्रेस तालुकाध्यक्ष दयारामजी भोयर, दुधराम सवालाखे, डॉ. रामसिंग सायरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये विदर्भातील नागपुर, वर्धा ,भंडारा, गोंदिया,चंद्रपुर, यवतमाळ,अमरावती,अकोला आदी जिल्हयातील ग्रामिण लोककलावंतानी आपल्या पारंपारिक लोककला सादर करून स्वर्ग.श्री भिवगडे यांना भावभिन श्रध्दाजंली अर्पण केली. पारंपारिक लोक कलेच्या माध्यमातुन ग्रामिण भागात लोक कलावंत हा समाजातील वाईट प्रथा, अंधश्रध्दा व घातक विचार धारेवर मारा करून शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, देश हितार्थ समाज प्रबोधनाचे मौलिक कार्य करित असल्याने या लोक कलावंताच्या अडसर येणाऱ्या समस्या त्वरित सोडवुन न्याय देण्याचे मा.श्री मंत्री सुनिल केदार यांनी ग्रामिण कलावंताना आश्वस्त केले. विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्य विभाग नागपुरचे सहाय्यक संचालक मा. संदीप शेंडे हयानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे स्वर्ग श्री धर्मदास भिवगडे यांना श्रध्दाजंली अर्पण करून कलावंताना सहकार्य करण्याची हमी दिली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाहीर अंलकार टेभुर्णे यांनी तर आभार नगरसेवक मनिष भिवगडे यांनी व्यकत केले.

कार्यक्रम यशस्वितेकरिता विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा व तालुका अध्यक्ष अरुण वाहने, राजकुमार घुले, वसंता कुंबरे, डॉ पारधी, नामदेव ठाकरे, जगन ठाकरे, धनगरे,.मनिष भिवगडे, राहुल लांजेवार, दशरथ बावणे, सुधिर लांजे वार, जगदीश देव्हारे, मिलिंद खोब्रागडे, चुडामनजी लांजेवार, रामटेके, महिला प्रतिनिधी ज्योतीताई वाघाये ,तुळसाबाई देशमुख, विद्याताई लंगडे, उर्मिला तेलंगरा व, पी एम डांगोरे सह विदर्भातील लोककलावंतानी मौलाचे सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज