Breaking News

*कन्हान झालेल्या पावसाने राय नगर येथील घराची भिंत पडली*

*कन्हान झालेल्या पावसाने राय नगर येथील घराची भिंत पडली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात गेल्या पाच दिवसापासुन सतत होत असलेल्या पावसामुळे रायनगर कन्हान येथील स्वर्ग.श्री विश्वनाथ जी रहाटे यांच्या घराची एकीकडची पुर्ण भिंत पडुन नुकसान झाले असुन कुठलिही जिवहानी झाली नाही.
शुक्रवार दिनांक.१७ सप्टेंबर पासुन सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे मंगळवार दिनांक २१ ला सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान राय नगर प्रभाग क्रमांक ५ कन्हान येथील स्वर्ग.श्री विश्वनाथ लक्ष्मणजी रहाटे यांचे घराची एकाकडील पुर्ण भिंत पडुन काही भिंत व घर साहित्य सह नुकसान झाले असुन घरी व बाजुला कुणीही नसल्याने कुठलिही जिवहानी झाली नाही. या घटनेची माहिती नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर व कन्हान मंडळ अधिकारी यांना दिली असता मंडळ अधिकारी जगदीश मेश्राम, पटवारी महेंद क्षीरसागर व कोतवाल बंडु वानखेडे घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून झालेल्या नुकसानी चा अहवाल पारशिवनी तहसिलदार कडे पाठविणार आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …