*” AFS-LONARA ” तर्फे कोरोना काळात गरजवंतानां हैप्पीनेस किट चे वाटप करुण दिला मायेचा हाथ*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- भारत नाही तर संपूर्ण जग आज ‘ कोविड 19 च्या महामारी समोर हतबल झालेले दिसत असतांना AFS-LONARA या संस्थेचे कार्यकर्ते – स्वंयसेवक सामाजिक मदत आणि सेवा कार्यास स्वतः चा जीव धोक्यात घालून पुढे येत आहेत. आजच्या या माहामारिच्या काळात समाजाच्या सर्व स्तरातील शोषित-वंचित-गरीब-पीड़ित नागरिक दूरदायी परिस्थिति समोर हवालदिल झालेले असतांना AFS-LONARA चे कार्यकर्ते अत्यंत कठिन परिस्थितित लोनारा व आसपास च्या क्षेत्रा मधे या नागरिकांना (हैप्पीनेस किट ) राशन पुरवठया सोबतच COVID-19 प्रतिबंदक उपकरणें जसे ऑक्सिमीटर, ऑक्सीजन कंसेंट्रेटर व निरजंतुक औषधे , COVID -19 बद्दल जन जागरण व वैक्सीन बद्दल जन जागृति आणि सर्व प्रकारच्या संभव मदतिसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज AFS-LONARA च्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचा हा विचार अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
‘ पे बॅक टू सोसाइटी’ ही प्रेरणा ठेऊन AFS-LONARA व ग्राम सेवा संघ व् जापान प्लेटफार्म व् JAFS (जापान एशियन एसोसिएशन एंड एशियन फ्रेंडशिप सोसाइटी) यांचा सहयोगाने व् आजच्या कोविड-19 च्या माहामारिच्या काळात COVID-19 Relief कार्याचे प्रेरनादायी अधिवक्ता श्री सत्यप्रकाश गणवीर ,श्री विशाल परांजपे , श्री ताराचंद कापसे, श्री पंकज शेलारे , श्री विक्रम ढ़मढेरे , श्री कपिल विरघट,श्री प्रफुल गणवीर , श्री अरविंद सवाईथुल व सर्व कार्यकर्ता आहेत व हया कामचे श्रेय डॉ रिव खिमिको मुराकामी (JAFS ) व् जापान प्लेटफार्म व् तसेच ग्राम सेवा संघ यांना AFS-LONARA यांनी समर्पित केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज