*आयटकच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमास गुरूवारी प्रारंभ होणार.*

*आयटकच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमास गुरूवारी प्रारंभ होणार.*


*हजारो कामगारांसह देशभरातील प्रतिनिधी मुंबईत दाखल*

खापरखेडा प्रतिनिधि – दिलीप येवले

*मुंबई दि.३०: आॉल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) अर्थात आयटक या भारतातील पहिल्या अखिल भारतीय ट्रेड युनियनला येत्या गुरुवारी दि.३१ ऑक्टोबर रोजी ९९ वर्षे पूर्ण होत असून शंभराव्या वर्षात आयटकचे पदार्पण होत आहे.३१ ऑक्टोबर पासून पुढील सबंध वर्षभर आयटकच्या वतीने शताब्दी वर्ष देशभर मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणार आहे.९९ वर्षांपूर्वी मुंबई शहरातच देशभरातील कामगार संघटनांनी एकत्र येऊन दि.३१ आक्टोबर १९२० रोजी आ‌यटकची स्थापना केली होती.मा.लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली आयटकचे हे स्थापना अधिवेशन चर्चगेट जवळच्या न्यु इंपिरियल थिएटरमध्ये भरले होते.आयटकचे पहिले अध्यक्ष होण्याचा मानही लाला लजपतराय यांनाच मिळाला होता. मुंब‌ईतच आयटकची स्थापना झाली असल्याने या शताब्दी वर्षाचा प्रारंभही मुंबई येथूनच करण्याचा निर्णय बंगळुर येथे डिसेंबर २०१८ मधे झालेल्या आयटकच्या राष्ट्रीय कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार गेल्या ९ महिन्यांपासून याची जोरदार तयारी महाराष्ट्र आयटकच्या वतीने सुरू आहे.ज्येष्ठ कामगार नेते र.ग.कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली व कॉ.एम.ए.पाटील,कॉ.सी.एन.देशमुख,कॉ.शाम काळे आदी सदस्यांचा समावेश असलेल्या एका स्वागत समितीचीही यासाठी स्थापना करण्यात आलेली आहे.स्वागत समितीच्या अनेक बैठकाही प्रभादेवी येथील काॕ.भू‌पेश गुप्ता भवनमध्ये यानिमित्त झाल्या आहेत.दादर येथील कोतवाल उद्यानापासून येत्या गुरूवारी सकाळी ११ वाजता कामगारांच्या विराट मिरवणूकीने शताब्दी वर्षाचा प्रारंभ होणार आहे.तसेच रवींद्र नाट्यमंदीरात शताब्दी वर्षाचा मुख्य कार्यक्रमही दुपारी २ वाजता होणार आहे.या कार्यक्रमास देशभरातून हजारो कामगार तसेच आयटकचे राष्ट्रीय नेते मुंब‌ईस येणे सुरू झाले आहे.आयटकचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. रामेंद्रकुमार (बिहार), महासचिव कॉ.अमरजित कौर (दिल्ली),माजी खासदार तथा आयटकचे माजी महासचिव कॉ.गुरूदास दासगुप्ता, कॉ.एच. महादेवन,सचिव कॉ.सुकुमार दामले आदी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रीय कौन्सिलचे सुमारे ४०० सभासद व देशातील १० प्रमुख कामगार सघंटनाचे नेते इटंकचे अध्यक्ष मा.संजीवा रेडी,सिटू महासचिव काॕ.तपन सेन,एच.एम.महासचिव मा.हरभजन सिंग आणी विविध कामगार संघटनांचे पुढारीही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त भारतातील कामगार चळवळीचा आढावा घेणाऱ्या एका स्मरणिकेचेही प्रकाशन रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे.आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ.शाम काळे यांचेसह कॉ.बबली रावत,काॕ.एकनाथ माने,
कॉ.प्रकाश सावंत,काॕ.राजु देसले, काॕ.प्रकाश बनसोड,काॕ.कृष्णा भोयरा आदी आयटकचे मुंब‌ईतील कार्यकर्ते व स्वागत समितीचे सर्व सदस्य शताब्दी वर्ष कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला जोडूनच १ व २ नोव्हेंबर रोजी आयटकच्या राष्ट्रीय कौन्सिल सदस्यांची बैठकही राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात होणार आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …