Breaking News

*कांद्री येथे महिलेचा गळफास लावुन मुत्यु* *फिर्यादी पती यांच्या तक्रारी वरुन मर्ग चा गुन्हा दाखल*

*कांद्री येथे महिलेचा गळफास लावुन मुत्यु*

*फिर्यादी पती यांच्या तक्रारी वरुन मर्ग चा गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हरिहर नगर वार्ड क्रमांक १ कांद्री येथील सौ मिनाक्षी भोंडेकर या महिलेनी राहत्या घरी ओढणीने गळफास लावुन मृत अवस्थेत आढळुन आली.
शुक्रवार (दि.१७) ला दुपारी ३ वाजता पुर्वी फिर्यादी आकाश धनराज भोंडेकर वय २५ वर्ष राहणार. हरिहर नगर वार्ड क्रमांक १ कांद्री यांची आई, वडील व भाऊ हे घरी हजर नसतांना त्याची पत्नी सौ मिनाक्षी आकाश भोंडेकर वय २३ वर्ष हिने अज्ञात कारणा वरून घरातील बेडरूम मधील छताच्या सिंमेट सिट च्या खाली असलेल्या लोंखडी पाईपला ओढणी बांधुन गळफास घेतल्या नंतर ती मृत अवस्थेत आढळुन आली. सदर प्रकरणी फिर्यादी पती आकाश भोंडेकर यांचे तोडी तक्रारीवरून कन्हान पोलीस.स्टेशन ला कलम १७४ जाफॉ कायद्यान्वये मर्ग नो़ंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री जावेद शेख हे करीत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …