*तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन जड वाहतुक बंद होणार काय ?*
*कन्हान नगर परिषद येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सभा बैठकीचे आयोजन*
*नप प्रशासन व पोलीस प्रशासन नागरिकांच्या हितार्थ निर्णय घेणार काय ? नागरिकांचे लक्ष*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा रेती चे ओव्हर लोड जड वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने स्थानिक नागरिकांना द्वारे आमदार , कन्हान पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकार्यांना निवेदन पत्र देऊन जड वाहतुक बंद करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असताच आज २७ सप्टेंबर ला दुपारी १२:३० वाजता कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे जड वाहतुक च्या मुद्यावर चर्चा सभेचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकी मध्ये नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासन नागरिकांच्या हितार्थ जड वाहतुक बंद करण्याचा निर्णय घेणार काय ? या कडे नागरिकांचे लक्ष असुन विविध चर्चा नागरिकांन मध्ये सुरु झाल्या आहे .

एका पत्रा द्वारे अशी माहिती मिळाली कि श्री वर्धराज पिल्ले शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनी दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी पोलीस स्टेशन कन्हान येथे लेखी स्वरुपात पत्र दिले आहे कि कन्हान पिपरी येथील गहुहिवरा या गावाकडे जाणाऱ्या महामार्गा वरील अवजड वाहनाची वाहतुक बंद न केल्यास दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल व कन्हान शहर शिवसेनेचे कार्यकर्ते व कन्हान शहरातील नागरिक यांच्या उपस्थितीत तारसा रोड कन्हान येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे पत्र कन्हान पोलीस स्टेशन ला देण्यात आले होते तसेच दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी कन्हान – पिपरी नगरपरिषद चे नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर केले असुन निवेदना मध्ये सांगितले कि तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा रेती व इतर प्रकारचे १४ चाकी , २० चाकी व इतर जड वाहनांची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु असुन हा मार्ग १० ते १२ फुटाचा असल्याने लहान गाड्यांना जाण्या येण्या करिता व तेथील स्थानिक नागरिकांना सुद्धा त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली असुन या संबंधात कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी सर्व साधारण सभा आयोजित करुन सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असुन त्यांच्या पत्राला अनुसरुन दिनांक २१ सप्टेंबर रोजी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी आंदोलन कर्त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलावुन त्यांची सभा आयोजित करुन त्यांना आंदोलना पासुन त्यांना पुरावृत्त करण्यात आले होते . तेव्हा आंदोलन कर्त्यांनी म्हटले कि दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी कन्हान – पिपरी नगर परिषद येथील सभागृहात रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात यावे त्या अनुषंघाने त्या सभेला मा.तहसीलदार साहेब पारशिवनी , मा.प्रादेशिक परिवहण कार्यालय नागपुर ग्रामीण चे अधिकारी , नगर परिषद नगराध्यक्षा , व इतर ट्रान्सपोर्टर यांना बोलवुन आज नगर परिषद येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे .

*नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासन नागरिकांच्या हितार्थ निर्णय घेणार काय ?*
कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गावरुन गेल्या काही दिवसान पासुन कोळसा रेती चे ओव्हर लोड जड वाहतुक सुरु झाल्याने येथे मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने या महामार्ग वरुन जड वाहतुक बंद करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांन कडुन मोठ्या प्रमाणात होत आहे . त्या अनुषंघाने आज २७ सप्टेंबर ला दुपारी १२:३० वाजता कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली जड वाहतुक च्या मुद्यावर चर्चा सभेचे आयोजन करण्यात आले असुन या सभे मध्ये नगर परिषद प्रशासन व कन्हान पोलीस प्रशासन नागरिकांच्या हितार्थ जड वाहतुक बंद करण्याचा निर्णय घेणार काय ? या कडे नागरिकांचे लक्ष असुन विविध चर्चा नागरिकांन मध्ये सुरु झाली आहे .
Maharashtra News Media सच की आवाज