*मौदा तालुक्यातील शेतकरी सततच्या पावसामुळे संकटात*
*नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ लाभ द्या – शेतकरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
मौदा – मौदा तालुक्यात सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला असुन ओल्या दुष्काळाची स्थिति निर्मात झाली आहे . शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार ऐवढे मात्र नक्की आहे . तालुक्यात सतत होत असलेल्या पावसामुळे येणाऱ्या पिकांचा आशा उध्दवस्त झाल्या आहे . अश्या प्रकारे जर वातावरण राहिले तर शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशी दाट शक्यता वाढल्याने कृषी अधिकार्यांनी प्रत्येक शेतकर्यांचा शेतात जाऊन पिकांची तात्काळ पाहणी करुन नुकसान भरपाई चे पंचनामे तात्काळ तयार करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कैलाश बरबटे व शेतकर्यांनी केली आहे .
सोयाबीन हातात आले असतांनाच पावसामुळे सोंगणी आणि काढणी थांबली आहे . दरवर्षी बाहेरच्या जिल्ह्यातुन मजदूर तालुक्यात दाखल होत असतात त्यातुन स्थानिक शेतकर्यांची कामे होतात . आणि आलेल्या मजदुरांना आर्थिक मोबदलाही समाधान कारक होत असल्याने शेतकरी व मजदुर अशा दोघांचाही गरज पुर्ण होतात . शेतकर्यांनी बेत आखला होता मात्र झालेल्या पावसामुळे त्यांचावर पाणी फेरले . सतत होत असलेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतातले पिंक जलमय झाल्याने याचा फटका चांगलाच बसला आहे .
मध्यंतरी कपाशी पीक डोलदार होते .रोगराई कपाशी पासुन दुर होती . परंतु नंतर जो पाऊस झाला त्यामुळे रोग तर आले पण येणारे पिक वाया गेले आहेत . आता तर शेणकर्यांचा कपाशी लागवड व फवारणीचा खर्च देखील निघणार नसल्याचे चित्र दिसुन येत असुन दुसरी कडे पावसने जास्त प्रमाणात कहर केल्याने येणारे पिक देखील विविध रोंगामुळे वाया जाण्याची दाट शक्यता वाढली आहे . एवढेच नव्हे तर दमदार पावसमुळे आधी निम्म्या गळालेल्या कपाशीच्या बोंड्या आता पुर्णपणे गळुन पडत आहे . त्यामुळे शेतकरी आता चार ही बाजुने संकटात सापडल्याने राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकर्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांनी राज्य शासना ला केली आहे .
Maharashtra News Media सच की आवाज