*बँरी. शेषराव वानखेडे महाविद्यालयातर्फे नँक मूल्यांकनावर आधारित आभासी चर्चासत्र संपन्न*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी:- दिलीप येवले
नागपुर:- बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडा येथे जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा आणि नागपूर येथील संताजी महाविद्यालय आणि यशोदा महाविद्यालय डॉ. एम. के उमाटे महाविद्यालयात महिला महाविद्यालय आणि धरमपेठ एम. पी. देव विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या आठ दिवसीय आभासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत नॅक मुल्यांकन संदर्भात महत्त्वाच्या असणाऱ्या सातही निकषावर सहभागी महाविद्यालयातर्फे सखोल विश्लेषण आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे. डॉ. श्रीहरी पिंगळे, संगमनेर अहमदनगर डॉ. अजय गोर, डॉ. स्वाती मदनवार नांदेड, डॉ. लीना गहाणे बेंगलोर, डॉ. मजूताय राव बंगलोर, डॉ. ज्योती पाटील नागपुर, डॉ. पोनमुधिरज बंगलोर, डाँ. पहाडे पुणे इत्यादी मान्यवर या चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले.
बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडा तर्फ नँक मूल्यांकनाच्या चौथ्या निकषावर इन्फ्रास्ट्रक्चर अँन्ड लर्निंग रिसोर्सेस या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. आर. जी. टाले यांनी नँक मूल्यांकनाचे महत्त्व अधोरेखित केले प्रत्येक महाविद्यालय
नँक द्वारे नामांकित असणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे ते म्हणाले मूल्यांकन आणि मान्यता याद्वारे शैक्षणिक संस्थेची गुणवंता ओळखली जात असून त्यासाठी नँकतर्फ सात निकष ठरविण्यात आले आहेत. गुणवत्तेची जोपासना ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी महाविद्यालयाला प्रोत्साहन देणे त्यांच्यातील गुणात्मक बदलांना श्रेय देणे हे नँक मूल्यांकनाच्या उद्देश आहे. नवीन शिक्षा प्रणालीनुसार नँक ने ही आपल्या मूल्यांकन प्रक्रियेत काही बदल केले आहेत. या मूल्यांकन प्रक्रियेचे सविस्तर माहिती व्हावी या दृष्टिकोनातून या अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या
प्रक्रियेची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून या आभासी कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे प्राचार्य डॉ. टाले यांनी सांगितले. आपल्या व्याख्यानात डॉ. स्वाती मदनवाढ यांनी महाविद्यालयातील मूलभूत सुविधा आणि संसाधने त्यावर होणारा खर्च या सगळ्याची नोंद असणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक गोष्टीचे अंकेक्षण असणे आवश्यक असून अद्ययावत सुविधाकडे संस्थेने विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. बाह्य संसाधने सोबत शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे तांत्रिक दृष्ट्या अध्यावत वर्ग खोल्या तसेच ग्रंथालय असले पाहिजे ऑफिस ग्रंथालय क्रीडा अशा विभागाचे कामकाज ई सर्विसेसच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप, फ्रीशिप अश्या शासन योजनांची व सुविधेची नोंद महाविद्यालयाच्या वेबसाईटवर असणे आवश्यक असल्याचे डॉ. स्वाती मदनवाढ यांनी सांगितले या चर्चासत्राचे संचालन महाविद्यालयाचे नँक समन्वयक डॉ. संगीता चौरे यांनी केले तर आभार डॉ. ज्योती सेलूकर यांनी मानले या चर्चासत्राला सातही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अखिलेश पेशवे, डाँ. प्रिया वंजारी, डॉ. ज्ञानेश नाईक, डॉ. विलास ढोमणे, डॉ. भांगडीकर, डॉ. धनराज शेटे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सातही महाविद्यालयाचे नेट समन्वयक तसेच बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयातील डॉ. अंजली पांडे, डॉ. गजानन सोमकुवर, डॉ. प्रतिभा गडवे, डॉ. उमेश जनबंधू, प्राध्यापक अभय काकडे उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज