Breaking News

*राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा*

*राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात साजरा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- तायवाडे महाविद्यालय महादुला- कोरडी जि. नागपुर अंतर्गत *राष्ट्रीय सेवा योजना युनिट* द्वारा *राष्ट्रीय सेवा योजना* *स्थापना दिवस* चा कार्यक्रम आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी जी. टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , साक्री ,धुळे येथील माजी प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे यांनी राष्ट्रीय एकात्मता या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गद्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या . त्यांनी विद्यार्थीनां मार्गदर्शन करुन राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे महत्त्व पटवून दिले.विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समाज सेवेची भावना निर्माण व्हावी व त्यातुनच समाज परिवर्तन घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना एक ढाल आहे. यांचे भान विद्यार्थीनी ठेवले पाहिजे. आणि आपल्या कला गुणांचा व व्यक्तीमत्त्वाचा विकास करावा व समाज सेवा करून राष्ट्रीय एकात्मता जोपासावी असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वर्षा वैद्य इंग्रजी विभाग प्रमुख, तर आभार प्रदर्शन डॉ.किशोर घोरमाडे, राष्ट्रीय सेवा योजना,कार्यक्रम अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. वकील शेख, डॉ. चंद्रकां भास्कर आणि राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते .तसेच समस्त रा.से.यो. स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …