Breaking News

*विद्यासागर कला महाविद्यालय येथे* *राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा*

*विद्यासागर कला महाविद्यालय येथे*

*राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा*

रामटेक – विद्यासागर कला महाविद्यालय खैरी (बिजेवाडा ) येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण देशात 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो. विद्यासागर कला महाविद्यालयात देखील या दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश सोमकुवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश सपाटे यांनी प्रास्ताविकातून या दिवसाचे महत्त्व विशद केले त्याचप्रमाणे आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. सुरेश सोमकुवर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांची कार्य, कर्तव्य आणि त्यांची भूमिका, तसेच राष्ट्र घडणीत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे असलेले महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा. डॉ. ज्योती कवठे, प्रा. रवींद्र पानतावणे, डॉ. आशिष ठाणेकर, रफिक कुरेशी, विनोद परतेती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल दाणी यांनी केले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …